Join us

सोनाली खरेची लेक करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? अभिनेत्री म्हणाली, "बरीचशी मंडळी तिला…"

By सुजित शिर्के | Updated: October 3, 2025 17:49 IST

सोनाली खरेने लेक सनायाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल दिली प्रतिक्रिया? अभिनेत्री म्हणाली...

Sonali Khare: अभिनेत्री सोनाली खरे हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. 'सावरखेड गाव','चेकमेट','७, रोशन व्हिला', ‘हृदयांतर’ अशा गाजलेल्या चित्रपटांमधून सोनाली खरे हे नाव घराघरात पोहोचलं. त्याचबरोबर सोनालीने 'आभाळमाया', 'अवंतिका' या मालिकांमध्येही काम केलं  आहे. सध्या अभिनेत्रीने 'नशीबवान' मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे, यामुळे ती चर्चेत आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिची लेक सनायाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल भाष्य केलं आहे. 

दरम्यान, सोनालीची लेक सनायानेही आता सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. गेल्या वर्षी सोनाली आणि सनाया 'मायलेक' चित्रपटात एकत्र पाहायला मिळाल्या. त्यात अलिकडेच सोनाली खरेनं 'लोकमत फिल्मी' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, अभिनेत्रीला तुमच्या मुलीचा भविष्यात मराठी इंडस्ट्रीत काम करायचा विचार आहे की बॉलिवूडमध्ये? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली,"नक्कीच, तिचा बॉलिवूडमध्येही काम करण्याचा विचार आहे, तिची आवड आहे. जसं माझ्या आईने मला मार्गदर्शन केलं, तसं मीही तिला मार्गदर्शन करते आहे." 

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "तिच्या सुदैवाने तिचे वडील तिची आई आणि बरीचशी मंडळी तिला यासाठी पाठिंबा देणारी आहेत मदत करणारी आहेत. शिवाय एक रस्ता दाखवणारी आहेत.लवकरच तिचं हे स्वप्न पूर्ण होईल, असं मला वाटतं. तिची या क्षेत्रात यायची इच्छा आहे. त्यादृष्टीने तिने शिक्षणही घ्यायला सुरुवात केली आहे."असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

सोनाली खरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ही अभिनेत्री स्टार प्रवाहच्या 'नशीबवान'मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत ती उर्वशी हे पात्र साकारते आहे. अलिकडेच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून त्यामध्ये आदिनाथ कोठारे, नेहा नाईक तसेच अजय पूरकर यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonali Khare's daughter to debut in Bollywood? Actress reveals support.

Web Summary : Sonali Khare's daughter, Sanaya, is considering a Bollywood career. Sonali supports her aspirations, providing guidance like her mother did for her. With family support and relevant education, Sanaya's Bollywood dream may soon materialize. Sonali currently stars in the 'Nashibvaan' series.
टॅग्स :सोनाली खरेटेलिव्हिजनसेलिब्रिटी