Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुबेहुब आईची कार्बन कॉपी आहे मृणालची लेक; पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:18 IST

Mrinal dusanis: अलिकडेच सगळ्यांनी मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला. या दिनाचं निमित्त साधत मृणालने तिच्या लेकीचा आणि नवऱ्याचा एकत्र फोटो शेअर केला.

'माझिया प्रियाला प्रित कळेना' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस (mrinal dusanis). गोड चेहरा, स्मित हास्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर मृणाल लोकप्रिय झाली. काही मोजक्या पण गाजलेल्या मालिकांमध्ये काम करणारी मृणाल सध्या तिचा जास्तीत जास्त वेळ लेकीला देत आहे. त्यात तिने तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

काही महिन्यांपूर्वीच मृणालने एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला. तेव्हापासून मृणाल तिचा जास्तीत जास्त वेळ आपल्या लेकीसह घालवत आहे. अलिकडेच मृणालने तिच्या मुलीचा एक गोड व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता तिचा फोटो शेअर केला आहे.

अलिकडेच सगळ्यांनी मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला. या दिनाचं निमित्त साधत मृणालने तिच्या लेकीचा आणि नवऱ्याचा एकत्र फोटो शेअर केला. यंदा मृणालच्या नवऱ्याने पहिल्यांदाच फादर्स डे साजरा केला. त्यामुळे हा आनंद तिने फोटोच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

दरम्यान, मृणालच्या लेकीचं नाव नुरवी असं आहे. मृणालने 2016 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेसोबत अरेंज मॅरेज केलं. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. नीरज अमेरिकेत राहात असून मृणाल देखील सध्या तिथेच असते. मृणालने 24 मार्चला मुलीला जन्म दिला. 

टॅग्स :मृणाल दुसानीससेलिब्रिटीटिव्ही कलाकारजागतिक पितृदिन