Join us  

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं नवं घर, म्हणते- "फायनली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 1:22 PM

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले खास फोटो

टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री अदिती द्रविडने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती. अदिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती ती चाहत्यांना देत असते. अदितीने एक गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. 

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर अदिती द्रविडने स्वत:चं घर खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत याबाबत अदितीने माहिती दिली आहे. अदितीने मुंबईत तिच्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. "फायनली, मी मुंबईला हो म्हणाले", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. अदितीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कलाकारांनीही अदितीने नवीन घर घेतल्याने तिचं अभिनंदन केलं आहे. 

अदितीने मालिकांबरोबरच नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे. अदिती 'बाईपण भारी देवा' सिनेमामुळे चर्चेत आली होती. 'बाईपण भारी देवा'मधील 'मंगळागौर' हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. हे गाणं अदितीने लिहिलं आहे. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

टॅग्स :अदिती द्रविडटिव्ही कलाकार