Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे! 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेता 'या' ठिकाणी बांधतोय 'ड्रीम होम', म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:21 IST

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेता 'या' ठिकाणी बांधतोय 'ड्रीम होम', म्हणाला... 

Abhijeet Kelkar Video: आपलं हक्काचं घर आणि फिरण्यासाठी गाडी असावीस, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. या वर्षात मराठी कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांचं स्वप्न साकार केलं आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका अभिनेत्याच्या नावाची भर पडली आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर आहे. घराचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास येईल तेव्हा त्याचं हे घर पाहण्यासाठी सगळेचजण उत्सुक असणार आहेत. 

नुकताच सोशल मीडियावर अभिजीत केळकरने त्याच्या घराच्या बांधकामाचा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. "स्वप्नांचा पाठपुरावा करा...", असं कॅप्शन अभिनेत्याने त्याच्या या व्हिडीओला दिलं आहे. अभिजित केळकर किही, अलिबाग येथे येथे त्याचं आलिशान घर बांधत आहे. घरासमोर ऐसपैस जागा,  मोठा हौद असा एक सुंदर व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत तसेच मुग्धा गोडबोले यांसारख्या सेलिब्रिटी मंडळींनी अभिनेत्याच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत त्याला  भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

वर्कफ्रंट

अभिजित केळकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'तुझेच मी गीत आहे', सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. सध्या रंगभूमीवर त्याचं 'आजीबाई जोरात' हे नाटक खूप जोरात सुरु आहे. 

टॅग्स :अभिजीत केळकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी