दुस-यांदा लग्न करणार ही मराठमोळी अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 15:47 IST
सध्या सर्वत्र बँड बाजा बारातचे सूर ऐकू येत आहेत.तुळशी विवाहानंतर सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.लग्न हा ...
दुस-यांदा लग्न करणार ही मराठमोळी अभिनेत्री?
सध्या सर्वत्र बँड बाजा बारातचे सूर ऐकू येत आहेत.तुळशी विवाहानंतर सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो.मात्र या सगळ्यात एक अभिनेत्री आहे जिच्या आयुष्यात दोन वेळा हा प्रसंग आला येणार आहे. कारण आता ती पुन्हा एकदा नववधूप्रमाणे सजली आहे. होय, आता ती दुस-यांदा लग्न करणार आहे. त्यामुळे ती खूप आनंदित असल्याचेही पाहायला मिळत आहे.तिचे फोटो हेच फोटो तिच्या आनंदाला पारावर उरला नसल्याची ग्वाही देत असल्याचे पाहयला मिळत आहे.आता ती अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच तर ती आहे.छोट्या पडद्यावरची राधा म्हणजेच आताची भानु अर्थात श्रृती मराठे. श्रृतीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फटोत ती नववधु प्रमाणे सजल्याचे पाहायला मिळतंय हातावर मेहंदी काढत बाशिंग बांधलेले फोटो तिने शेअर केले आहेत.तिचे हे फोटो पाहताच तिचे फॅन्सही संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्याच वर्षा लग्नबंधनात अडकलेली श्रृती मराठेचे फोटो पाहून सारेच तिला कमेंटच्यामाध्यमातून वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसतायेत.यावर श्रृतीने कोणतेही उत्तर दिले नसले तरी आम्ही या गोष्टीचा खुलासा करणार आहोत.श्रृती मराठे लग्न करणार हे खरे आहे.मात्र ते रिल लाईफमध्ये लग्न करणार आहे.श्रृती सध्या 'जागो मोहन प्यारे' मालिकेत भानुची भूमिका साकरत आहे.या मालिकेत तिचे लग्न ठरल्याचे दाखवले होते. त्यानुसार भानुच्या लग्नाचा ट्रॅक मालिकेत पाहायला मिळणार आहे.लग्नाच्या या सीनच्या शूटिंगवेळी तिला तिच्या ख-या लग्नाची आठवण झाली. तिचे मेहंदी सेरेमनी असेल किंवा हळदी सेरेमनी प्रत्येक गोष्ट तिला यावेळी आठवली. म्हणूनच पुन्हा एकदा या रिल लाईफ लग्नावेळी श्रृती तिच्या रिअल लाईफ लग्नाच्या आठवणीत रममाण झाल्याचे पाहायला मिळाले. ख-या आयुष्यात श्रृतीचे शुभमंगल अभिनेता गौरव घाटणेकरशी पार पडले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या सिनेमात काम करता करता सेटवर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.जवळपास तीन वर्षे हे लवबर्ड्स एकमेकांच्या प्रेमात आंकात बुडाले होते.अखेर एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यानंतर दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. दोघांचे शुभमंगल मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडले होते.