Join us  

मनपाने आरोग्य कर्मचाºयांची भरती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:28 PM

शहरातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, अशी मागणी उपमहापौर भीकूबाई बागुल यांनी आयुक्तांकडे केली आहे.

नाशिक : शहरातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, अशी मागणी उपमहापौर भीकूबाई बागुल यांनी आयुक्तांकडे केली आहे. उपमहापौर बागुल यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले असून, त्यात विविध प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या चाचणीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी महापालिकेने स्वत: प्रयोगशाळा सुरू करावी तसेच रॅपिड टेस्टिंग किट खरेदी करावे. सदरच्या किट चीननिर्मित न घेता अन्य देशांच्या उत्पादनातून घ्यावे, अशी मागणीही बागुल यांनी केली आहे. शहरातील अनेक खासगी वैद्यकीय व्यावसायिक निष्णात आहेत त्यांची सेवा महापालिकेला मिळावी यासाठी त्यांची तातडीने मानधनावर नियुक्ती करावी त्याचप्रमाणे खासगी रु ग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने व्यवस्था निर्माण करावी विशेषत: कोरोनाबाधितांवर आणि उपचार करण्यासाठी जादा दर आकारणी होऊ नये यासाठी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी बागुल यांनी केली आहे. याशिवाय महापालिकेच्या सर्व कार्यालयात येणाºया सर्व अभ्यागतांची ताप मोजणी व्हावी या दृष्टीने अद्ययावत यंत्रणा उभारावी मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट व अन्य साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे व गरजेनुसार आरोग्य कर्मचाºयांची भरती करावी, अशा मागण्याही बागुल यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :नाशिक महानगर पालिकाकोरोना वायरस बातम्याआरोग्य