Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन उडू उडू झालं' फेम इंद्रानं सिनेमात दिले किसिंग सीन, म्हणाला - 'याआधी मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:24 IST

Ajinkya Raut: 'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत सध्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आला आहे.

झी मराठीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) मालिकेने कमी कालावधीत खूप लोकप्रियता मिळवली. इंद्रा दिपूची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यामुळे मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेचं प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. सध्या इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत एका हटके अंदाजात पुन्हा एकदा समोर येणार आहे. अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) 'टकाटक २' (Takatak 2) या सिनेमात दिसणार आहे. इतकेच नाही तर या चित्रपटामुळे सध्या तो खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने बोल्ड सीन दिले आहेत. 

इंद्राच्या भूमिकेतून अजिंक्य राऊत घराघरात पोहचला. दिपूची काळजी घेणारा, प्रेमात वेडा पण तितकाच शहाणा आणि सच्च्या मनाचा इंद्रा साकारताना अजिंक्यला मजा आली असं तो सांगतो. पण मालिकेनंतर त्याला टकाटक २ मध्ये वेगळ्या  अवतारात बघून प्रेक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया समोर येते आहे, असे त्याने स्वतः सांगितले आहे.

याबद्दल तो म्हणाला की, चित्रपटात मी शऱ्याची भूमिका साकारली आहे. याआधी मी कधीच असे बोल्ड भूमिका केली नव्हती. मला शिव्या द्यायची सवय नाही, त्यामुळे हे पात्र साकारताना मी शक्य तितका निरागस भाव ठेवायचा प्रयत्न केला आहे. माझे शूट सुरु झाल्यावर अगदी सुरुवातीच्या काळातला सीन हा किसिंगचा होता. एका मोकळ्या मैदानावर सीन शूट होणार होता. पण मी ठरवलं होते की आता यामध्ये उडी घेतलीय तर काम चोख करायचे. आपल्या स्वभावापेक्षा वेगळे काहीतरी करावे लागले तरी करायचे. त्यामुळे मी माझं शंभर टक्के देऊन हे धाडस करायचा प्रयत्न केला आहे. तो सीन झाल्यावर अक्षरशः एखादा टप्पा पार केल्यासारखे वाटत होते.

टॅग्स :टकाटक