Join us

मनिषला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:46 IST

मनिष पॉलला काही दिवसांपूर्वी एका चित्रीकरणादरम्यान दुखापत झालेली आहे. त्याच्या उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो काही दिवस तरी चित्रीकरण ...

मनिष पॉलला काही दिवसांपूर्वी एका चित्रीकरणादरम्यान दुखापत झालेली आहे. त्याच्या उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो काही दिवस तरी चित्रीकरण करू शकणार नाही. त्यामुळे सध्या तो घरी आराम करत आहे. मनिषने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीचा फोटो टाकला असून त्याबाबत माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, मला दुखापत झाली असून मी काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. पण लवकरच परतण्याचे मी ठरवले आहे.