Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसा वाटला मानस-वैदेहीचा हा रोमँटीक अंदाज,पाहायला मिळणार एक ट्विस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:15 IST

मेहंदीच्या दिमाखदार सोहळ्यानंतर आता वैदेही आणि मानस यांच्या संगीत समारंभाची लगबग सुरु झाली आहे.

लग्नातील धम्माल काय असते हे प्रत्येकालाच माहिती आहे. हीच धम्माल करण्याची संधी कुणीही सोडत नाहीत. म्हणून ऑनस्क्रीन होणा-या लग्नातला थाट पाहिला तर रिअल लग्नच होत असल्याचा भास होतो.असेच काहीसे चित्र फुलपाखरू मालिकेत पाहायला मिळत आहे.पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.त्यामुळे लग्नाची खरेदी, मेहंदी, संगीत आणि हळद हे समारंभ हे मोठ्या थाटात पार पडणार आहेत. आता ऑनस्क्रीन होणा-या लग्ना पूर्वी पार पडणा-या कार्यक्रम सारेच एन्जॉय करत आहेत. मेहंदीच्या दिमाखदार सोहळ्यानंतर आता वैदेही आणि मानस यांच्या संगीत समारंभाची लगबग सुरु झाली आहे.

हा संगीत समारंभ देखील तितकाच दिमाखदार असणार आहे. वैदेही आणि मानस यांचे सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार या समारंभात आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणार असून एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर करणार आहेत . इतकंच नव्हे तर मानस आणि वैदेही यांचा देखील एक स्पेशल परफॉर्मन्स म्हणजेच कपल डान्स  या संगीत समारंभात सादर होणार आहे. तसेच मुलाच्या संगीतमध्ये मानसचे आई बाबा मंचावर थिरकणार आहेत. शीतल राजे आणि शाल्मली मॅडम एका रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करणार आहेत.

मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन झाली आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यामुळे या दोघांचा ऑनस्क्रीन रंगणा-या विवाहसोहळा पाहण्यासाठी सारेच उत्सुक असल्याचे पाहायाला मिळत आहे.विविध कार्यक्रमात वैदेहीने परिधान केलेला लेहंगा असो किंवा मग मानस रोमँटीक अंदाज अशा वेगवेगळ्या गोष्टींवर सध्या चर्चाही रंगताना पाहायला मिळत आहे.

या समारंभावेळी मालिकेत एक ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. या समारंभात काही आगंतुक देखील येणार आहेत. बुरखा घालून २ बायका तिच्या मेहंदी समारंभात सहभागी होणार आहेत. या बायका कोण असणार आहेत? त्या अशा गुप्तपणे या समारंभात कशा सहभागी झाल्या आणि त्यांचा काय उद्देश आहे? त्यांच्या येण्यामुळे काही अडचण निर्माण होणार का? हे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहे.