Join us  

'Man Udu Udu Zal : लोकप्रिय मालिका 'मन उडू उडू झालं' घेणार प्रेक्षकांचा निरोप, यादिवशी टेलिकास्ट होणार शेवटचा एपिसोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:46 PM

मन उडू उडू झालं मालिक संपणार आहे. त्याजागी एक प्रसिद्ध अभिनेत्री छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे रोजच प्रेक्षकांसमोर मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात काही मालिका पहिल्या भागापासून हिट होतात. तर, काही मालिका कितीही प्रयत्न केला तरी फारशा लोकप्रिय होत नाही. अशामध्येच एक लोकप्रिय ठरलेली मालिका अल्पावधीत प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

ह्रता दुर्गुळेआणि अजिंक्य राऊतची मन उडू उडू झालं (Man Udu Udu Zhala)  मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका आता अखरेच्या टप्प्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मन उडू उडू झालं मालिकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. १३ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे.

आता त्याजागी 'तू चाल पुढं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून दीपा परब छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा या प्रोमो मधून झळकते.

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना दीपा परब म्हणाली, "बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परातल्याची भावना आहे. तू चाल पुढं या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून हि कथा गृहिणी असलेल्या अश्विनी भोवती फिरते आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधी नंतर मराठी मालिका करतेय त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते. या मालिकेतील अश्विनी हि प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याचसोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे."

टॅग्स :झी मराठी