Join us  

‘माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरुनाथवर होत नाही 'या' कधीच गोष्टीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 6:30 AM

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आणि बायको व सासूला पुरेपूर राग येईल अशी आपली नकारात्मक भूमिका अप्रतिम वठवणारा अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर

माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आणि बायको व सासूला पुरेपूर राग येईल अशी आपली नकारात्मक भूमिका अप्रतिम वठवणारा अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिजीत पहिल्यांदाच या मालिकेतून खलनायकी छटा असलेली भूमिका रंगवतो आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून दादही मिळते आहे. मात्र अशी नकारात्मक भूमिका साकारताना कलाकारांच्या मनावर निश्चितच परिणाम होतात आणि ते होऊ नयेत यासाठी फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावतो, असं अभिजीत सांगतो.

एक कलाकार म्हणून आपण काम करत असताना आपण दोन व्यक्तींचे जीवन जगत असतो, असं तो म्हणतो. घरी आपण स्वत: वेगवेगळ्या भूमिकांतून, विचारांनी जगत असतो, तर सेटवर काम करताना तेही जर डेली सोप असेल तर दररोज आपण साकारत असलेल्या पात्रात शिरून त्याचे जीवन आपण जगत असतो; पण खरी कसरत तेव्हा होते, जेव्हा एखादी गोष्ट अधिक वाईट, नकारात्मक दाखवायची असते, असं तो सांगतो आणि ही नकारात्मक बाजू पडद्यावर रंगवताना त्याचा हळूहळू का होईना प्रभाव आपल्या खऱ्या जीवनावर पडू नये यासाठी काटेकोर काळजी घ्यावी लागते.

आपण पडद्यावर साकारलेलं पात्र ही आपली कला आहे आणि आपलं आयुष्य हे खरं वास्तव या गोष्टी सतत मनात असणे गरजेचे असते. तरच आपल्या मनात इतर वाईट विचारांना थारा मिळत नाही.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोअभिजीत खांडकेकर