Join us  

'माझा होशील ना'मध्ये समोर येणार आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा खरा मालक, जाणून घ्या कोण आहे 'तो'?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 1:58 PM

सरीकडे आदित्यच्या भूतकाळाबद्दल त्याला आणि जगाला सगळं खरं सांगायचं आणि कंपनी आदित्यला सोपवायची असं मामा ठरवतात.

छोट्या पडद्यावरील  'माझा होशील  मालिका सुरुवातीपासून चांगलीच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. वेगवेगळ्या रंजक घडामोडी घडत मालिका वेगळ्याच वणावर आली आहे. मालिकेतील रंजक कथानकामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. मालिकेतीस सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. 

मालिका 'माझा होशील ना'मध्ये एक विलक्षण वळण आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की आदित्यला जेडीच्या ऑफिसमध्ये काही असे पुरावे सापडतात जे आदित्यच्या भूतकाळाशी जोडलेले असावेत असं त्याला वाटतं. त्यामुळे तो पोलिसात जाण्याचा निर्णय घेतो पण हि खबर जेडी पर्यंत पोहोचते आणि तो आदित्यवर हल्ला घडवून आणतो.  

सई तिथे वेळेत पोहोचते त्यामुळे आदित्यचा जीव थोडक्यात बचावतो आणि तो मृत्यूशी झुंज देऊन अखेर वाचतो. आता मालिकेत प्रेक्षक पाहू शकतील कि आदित्यचा खऱ्या ओळखीबद्दल जेडीला माहित झालंय म्हणूनच त्याने आदित्यवर हल्ला केलाय असा मामांना अंदाज येतो. त्यामुळे ते आदित्यला घरी परत ये हा आग्रह करतात पण तो नकार देतो. 

सरीकडे आदित्यच्या भूतकाळाबद्दल त्याला आणि जगाला सगळं खरं सांगायचं आणि कंपनी आदित्यला सोपवायची असं मामा ठरवतात. आदित्यला त्याच्या भूतकालाकाबद्दल सर्व खरं कळेल का? आदित्यच कंपनीचा खरा मालक आहे हे सर्वांना पटेल का? जेडी अजून काही डाव साधून आदित्यला अडचणीत आणेल का?हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.