Join us

माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा

By ऋचा वझे | Updated: February 19, 2025 17:13 IST

आज शिवजयंतीनिमित्त तिने लोकप्रिय 'माझ्या राजा रं' गाण्याच्या ओळी गाऊन दाखवल्या. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मैथिली ठाकूर (Maithili Thakur) ही गायिका सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या मधूर आवाजाने तिने रसिकांवर जादू केली आहे. मैथिली बिहारची आहे तरी सगळ्या भाषांमध्ये ती उत्तम गाणी गाते. तिचे युट्यूबवर अनेक सबस्क्रायबर्स आहेत. बॉलिवूडसाठी गाणं गाणार नाही असा पण तिने केला आहे. मैथिलीच्या आवाजात भक्तीपर गाणी खूप छान वाटतात. आज शिवजयंतीनिमित्त तिने लोकप्रिय 'माझ्या राजा रं' गाण्याच्या ओळी गाऊन दाखवल्या. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मैथिली ठाकूर भजन, कीर्तन, भक्तीगीतांसाठी ओळखली जाते. तरुण पिढीसाठी ती प्रेरणादायी आहे. बिहारची असूनही ती इतर भाषांमध्ये उत्तम गाते. इतकंच नाही तर उच्चारही अगदी अचूक करते. आज शिवजयंतीनिमित्त अनेक छत्रपती शिवाजी महाराजांवरील अनेक गाणी ऐकू येत आहेत. मैथिलीनेही आदर्श शिंदेंचं लोकप्रिय असलेलं 'माझ्या राजा रं' गाणं गायलं. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले, "शौर्य, धोरण आणि न्याय यांच्या अद्भुत संगमाला नमन ! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"

मैथिलीच्या गायनाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. ती माझ्या राजा रं म्हणते तेव्हा सर्वांच्याच अंगावर काटा येतो. मैथिलीने याआधीही काही मराठी भावगीतं गायली आहेत. खूप कमी वयात मैथिलीने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या ट्रॅलेंटच्या जोरावरच तिने ही उंची गाठली आहे. मैथिली अनेकद महाराष्ट्रातही आली असून तिने इथेही आपल्या सुरेल संगीताचं दर्शन घडवलं आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजशिवजयंतीसंगीतसोशल मीडिया