Join us

माधुरीने केले नाना व मकरंदचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 01:46 IST

 अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे नामच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या  समाजकार्याची माहिती सर्वानाच माहित आहे. नानांचे व ...

 अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे नामच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या  समाजकार्याची माहिती सर्वानाच माहित आहे. नानांचे व मकरंदच्या या कामाची  प्रशंसाची चर्चा नेहमीच होते. पण जेव्हा या मराठमोळया कलावंतांचे कौतुक खुद्द बॉलीवुडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितच करते. त्यावेळी अभिमानाने कॉलर ताठ होते. तसेच मला ही सामाजिक जबाबदारीची जाणीव असून महिला व लहान मुलांसाठी मी देखील कार्य करते.त्या कामाचे स्वरूप वेगळे आहे. तसेच  मराठी चित्रपट इंडस्ट्रीचे कौतुकदेखील तिने यावेळी केले. कटयार काळजात घुसली व नटसम्राट हे दोन चित्रपट वेगळया मांडणीमुळे मला खूप आवडले. असाच एखादा वेगळा विषय मराठीमध्ये मला देखील मिळाला तर  नक्कीच मला ही मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. असे पुण्यातील एका कार्यक्रमावेळी  माधुरी बोलत होती.