Join us

सरस्वती मालिकेतील तितिक्षा तावडेचा लूक ठरतोय हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:15 IST

सरस्वती मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेमध्ये काहीच दिवसांपूर्वी दुर्गाची एन्ट्री झाली ...

सरस्वती मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेमध्ये काहीच दिवसांपूर्वी दुर्गाची एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासूनच दुर्गाची भाषा, तिची बोलण्याची स्टाईल, सगळंच प्रेक्षकांना आवडत आहे. दुर्गाचं उदं ग अंबे उदं बोलण्याची स्टाईल असो वा विद्युलला कैकालीच्या आईसाहेब बोलणं असो वा भुजंगला लबाड बोलणं असो प्रेक्षकांनी सगळ्यालाच पसंती दिली आहे. दुर्गाचा बेधडक आणि बिनधास्त स्वभाव विद्युलवर भारी पडत आहे. तिच्या प्रत्येक कारस्थानांना, चालींना दुर्गा उलटून लावत आहे. या सगळ्या घटनांमध्ये प्रेक्षकांना अजून एक सरप्राईझ मिळाले ते म्हणजे त्यांची लाडकी सरस्वती, मोठ्या मालकांची सरू मालिकेमध्ये नुकतीच परतली. एकीकडे दुर्गा ही अत्यंत बिनधास्त आणि सरस्वती थोडी जपून वागणारी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी अशी आहे. दुर्गाचा वाड्यातील वावर खूपच बिनधास्त आहे. त्यामुळे मालिकेमध्ये एकप्रकारचे हलकेफुलके वातावरण तयार झाले आहे. दुर्गा कशी वागेल, कुठे काय बोलेल याचा काही नेम नाही. ती कुणालाच घाबरत नाही, या कारणामुळे दुर्गाला आपल्या तालावर नाचवणे विद्युलसाठी कठीण झाले आहे. दुर्गाच्या वाड्यातील काही गंमती जमती तसेच दुर्गाचे विद्युल आणि भुजंग बरोबर उडणारे खटके असो वा मोठ्या मालकांसोबतची छोटी– मोठी भांडणं असो सगळंच प्रेक्षकांनी स्वीकारले आहे.यावर दुर्गा आणि सरस्वतीची भूमिका साकारणारी तितिक्षा तावडे सांगते, “सरस्वती मालिका सुरू झाल्यापासून मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडल्या. मालिकेत प्रेक्षकांना सरस्वतीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली. लग्नाआधीची सरस्वती, लग्नानंतरची सरस्वती, मोठ्या मालकांच्या प्रेमात पडलेली, त्यानंतर देविका आल्यानंतरची सरस्वती म्हणा किंवा आताची दुर्गा. दुर्गा जी सरस्वती सारखी दिसते पण तिचे वागणं, बोलणं, चालणं आणि पेहेराव सगळंच वेगळं आहे, ही भूमिका करणे माझ्यासाठी खरंच खूप मोठं आव्हानं होतं. पण प्रेक्षकांनी या रूपात मला, माझ्या भूमिकेला देखील स्वीकारले या बद्दल सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. असंच माझ्यावर आणि आमच्या मालिकेवर प्रेम करत रहा.”Also Read : सरस्वती मालिकेच्या सेटवरील सरू आणि देविकाची ऑफ स्क्रीन धम्माल !