Join us  

मराठी बिग बॉसच्या स्पर्धकांची लिस्ट आली समोर, हे कलाकार करणार कल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 2:32 PM

'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्याविषयी माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलला देखील विचारण्यात आले होते.

सध्या छोट्या पडद्यावर मराठी बिग बॉसची चर्चा  रंगत आहे. वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाने रसिकां चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यावेळी कोणते चेहरे झळकणार याचीही जोरदार चर्चा सुरू  आहे. त्यानुसार स्पर्धकांच्याही नावांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तसेच या घोषणेपूर्वीच कलर्स चॅनेलने एक क्वीज रसिकांसमोर ठेवले आहे. त्या पोस्टरमध्ये काही आद्याक्षरं टीपण्यात आली आहेत. त्यावरून रसिकांना कोणते कलाकार यावेळी सहभागी होणार हे ओळखायचे आहे.

 

पोस्टरवर दिलेल्या आद्यक्षरांनुसार  वैदेही परशुरामी, अक्षया गुरव, चिन्मय मांडलेकर, सुव्रत जोशी, अभिनय बेर्डे, सुयश टिळक अशी नावं रसिक सुचवत आहेत. त्यामुळे शोमध्ये रसिकांनी सुचवलेले चेहरे झळकल्यास नवल वाटु नये.  तसेच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार असल्याचे बोलले जात आहे.

 

'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्याविषयी माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलला देखील विचारण्यात आले होते. रसिकानेच याबाबत नुकताच खुलासा केला होता. बिग बॉस मराठीच्या टीमकडून अद्याप कोणत्याच स्पर्धकाचे नाव सांगण्यात आलेले नाही. तसेच कोणत्या कलाकाराने देखील बिग बॉसमधील प्रवेशाबाबत मीडियाला काहीही सांगितले नाही. त्यामुळे केवळ सगळेच स्पर्धकांबद्दल केवळ तर्क वितर्क लावत आहेत.

बिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर आपल्याला बिग बॉस मराठी पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनच्या अंतिम फेरीत मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर या स्पर्धकांनी मजल मारली होती. प्रेक्षकांच्या मतांमुळे प्रेक्षकांची लाडकी मेघा धाडे या कार्यक्रमाची विजेती ठरली होती.

 

टॅग्स :बिग बॉस मराठीचिन्मय मांडलेकरसुव्रत जोशीसुयश टिळकमहेश मांजरेकर