चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जागवल्या गेल्या लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 17:01 IST
चला हवा येऊ द्या मध्ये मराठीतील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या लाडक्या लक्ष्याच्या आठवणींना उजाळा ...
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जागवल्या गेल्या लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणी
चला हवा येऊ द्या मध्ये मराठीतील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या लाडक्या लक्ष्याच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. त्याच्या या अाठवणी त्याचेच काही सहकलाकार शेअर करणार आहेत. १६ डिसेंबर हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृती दिन... या दिवशी या लाडक्या अभिनेत्याने या जगातून एक्झिट घेतली होती. परंतु त्यांनी मागे असंख्य आठवणी ठेवल्या आहेत. त्यांच्या याच आठवणींना चला हवा येऊ द्यामधून उजाळा देण्यात येणार आहे. चला हवा येऊ द्याच्या या खास भागात महेश कोठारे, विजय कदम, निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, किशोरी अंबिये आणि इतर काही कलाकार सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनयसुद्धा या भागात सहभागी झाला होता... त्याने हमाल दे धमाल चित्रपटातील गाण्यावर डान्स करुन बाबांची आपल्यातली झलक दाखवून दिली.