Join us

जाणून घ्या कसा गेला बिग बॉस मराठीचा दुसरा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:56 IST

बिग बॉसच्या घरातील दुसरा दिवस एका नव्या गाण्याने सुरू झाला. काल झालेल्या नॉमिनेशनमुळे सगळेच सतर्क झाले आणि त्यामुळे आज ...

बिग बॉसच्या घरातील दुसरा दिवस एका नव्या गाण्याने सुरू झाला. काल झालेल्या नॉमिनेशनमुळे सगळेच सतर्क झाले आणि त्यामुळे आज स्वयंपाक घरातील दृश्य जरा वेगळंच दिसणार आहे. स्वयंपाक घरामध्ये तसेच इतर छोट्या – मोठ्या बाबींमध्ये मदत करताना सगळेच दिसणार आहेत. सई लोकूर आणि सुशांत शेलार यांनी स्वयंपाक घरातील काम करण्यात बरीच मदत केली. दरम्यान सगळ्यांच्या आवडत्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांनी स्वयंपाक करत असताना काही टिप्स मुलींना दिल्या. बिग बॉसच्या घरामध्ये घरातील पुरुष मंडळी देखील काम करताना दिसणार आहेत.विनीत भोंडे हा बिग बॉसच्या पहिल्या सीझनचा कॅप्टन बनल्या नंतर स्पर्धकांना त्याने जबाबदाऱ्या वाटून दिल्या. घरामध्ये येऊन एकच दिवस झाला आहे. पण स्पर्धकांनी एकमेकांना वेगवेगळी नावे ठेवायला देखील सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आज अंताक्षरी आणि डमशराजचा खेळ रंगणार आहे. ज्यामुळे घरामध्ये बरेच खेळीमेळीचे वातावरण बघायला मिळणार आहे. स्पर्धकांमध्ये भूषण कडू, आस्ताद काळे यांनी त्यांच्यासोबत घडलेले बरेच मजेदार किस्से घरच्यांना सांगितले.रेशम टिपणीस आणि मेघा धाडे यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रामधील प्रवासाबद्दल घरच्यांना माहिती दिली. मेघा धाडेने तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, तिचा जळगाव ते मुंबई पर्यंतचा प्रवास घरच्यांना सांगितला. मेघा हे सांगताना खूपच भावूक झाली होती. बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासूनच खटके उडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अनिल थत्ते आणि उषा नाडकर्णी या दोघांमध्ये बरेच मतभेद आहेत, या दोघांचे एकमेकांशी पटत नसून त्यांच्यामध्ये आता खटके उडत आहेत. अनिल थत्ते यांनी केलेल्या आत्महत्याच्या वक्तव्यामुळे घरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनिल थत्ते घरामध्ये बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करताना दिसतात. मग ते त्यांचे कपडे असो वा टिकली असो वा त्यांची प्रकृती असो वा त्यांचे विचार असो. दुसरीकडे रेशम आणि आस्ताद काळे या दोघांना उषा नाडकर्णी यांच्या प्रकृतीविषयी बरीच काळजी असल्याचे त्यांनी सांगितले. घरामध्ये इतकी लोकं एकत्र राहाणार म्हणजे भांड्याला भांड हे लागणारच.पण, नॉमिनेशेन झाल्यानंतर नक्की कोण कोणाबरोबर आहे? कोणाच्या मनामध्ये कोणाबाबत काय आहे? हे आता कळेल. Also Read : असा गेला बिग बॉस मराठीचा पहिला दिवस