Join us

"माझी पहिलीच मालिका, मी खूप बावरलो..." लवंगी मिरचीमधील निशांतच्या भूमिकेबद्दल पहिल्यांदाच बोलला तन्मय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 07:00 IST

तन्मय आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाला, 'निशांत' या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर तो खूप हळवा आहे.

“लवंगी मिरची” ही नवी मालिका झी मराठी काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या शिवानी बावकर  एका एका डॅशिंग मुलीच्या भूमिकेत दिसतेय जी अन्याया विरुद्ध आवाज उठवतेय, आपल्या आईला हक्क मिळवून देण्यासाठी लढतेय. यात निशांतची भूमिका अभिनेता तन्मय जक्का साकारतोय. 

तन्मय आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाला, 'निशांत' या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर तो खूप हळवा आहे. पण तरुण रक्त असल्यामुळे तितकाच हटके, रावडी आणि डॅशिंग असा मुलगा आहे. तो मुंबई-पुणे अश्या ठिकाणावरून शिकून आला असला तरी तो जे सध्या वसुलीचं काम करतोय त्याचं कारण म्हणजे त्याच्या वडिलांना झालेली दुखापत व त्यांच्यावर झालेल्या हल्ला. त्यामुळे त्याला वडिलांचा व्यवसाय स्वतःच्या हातात घेऊन आईबरोबर सांभाळावा लागतोय. निशांत खूप वेगळा आहे, आणि जे काही काम असेल ते प्रेमाने करीन अशी त्याची मानसिकता आहे. म्हणूनच त्याचं म्हणणं असतं की "काळजातच राहायचं, डोस्क्यात नाय जायचं" कारण 'दल दल साफ करायची असेल तर स्वतः दलदलित उतरावं लागतं.' या सगळ्यात अस्मिचा तिखटपणा आणि राधाक्का च्या मायेमुळे त्याच्या स्वभावात पण सकारात्मक बदल घडतो. आणि त्याच्या कुटुंबाकडून प्रेमाचा असलेला अभाव देखील त्याला राधाक्काकडून मिळतो.

पुढे तो म्हणाला, सहकलाकारांबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला जेव्हा कळलं कि 'लवंगी मिरची' मालिकेमध्ये मध्ये एवढी कमाल स्टार कास्ट आहेत, तेव्हा सुरुवातीला मी खूप बावरलो. ही माझी पहिलीच मालिका आहे, त्यामुळे मी या सर्व मोठ्या कलाकारांसोबत परफॉर्म करायचं खूप टेन्शन घेतलं होतं. पण नंतर जसं शूटिंग सुरु झालं तसं  जाणवलं की प्रत्येकजण मला खूप मदत करत आहेत, मला सांभाळून घेत आहेत. त्यामुळे आता मला सगळ्यांसोबत काम करायला खूप मज्जा येऊ लागली आहे आणि मी शूटिंग प्रोसेस एन्जॉय करायला लागलो आहे. तन्मयची ही पहिलीच मालिका आहे.  

टॅग्स :झी मराठी