Join us  

'ललित २०५'ने गाठला १०० एपिसोड्सचा टप्पा, सेटवर केले जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 3:46 PM

'ललित २०५' या मालिकेचे नुकतेच १०० एपिसोड्स पूर्ण झाले. या निमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले

ठळक मुद्दे'ललित २०५' या मालिकेचे १०० एपिसोड्स पूर्ण सेटवर केक कापून केले सेलिब्रेशन

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेचे नुकतेच १०० एपिसोड्स पूर्ण झाले. या निमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते. मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यामुळे सेटवर उत्साहाचे वातावरण होते. निर्माता म्हणून सोहम बांदेकरची ही पहिलीच मालिका असल्यामुळे तो खूपच उत्सुक होता.

'ललित २०५'च्या निमित्ताने खूप गोष्टी शिकता आल्या. नवी माणसे भेटली. त्यामुळे सर्वांशी कामासोबतच इमोशनल बॉँडिंग झाले आहे. स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार मानतो, त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली, असे सोहम बांदेकरने यावेळी सांगितले.

१०० एपिसोड्स ही खरे तर सुरुवात आहे. 'ललित २०५' मालिकेच्या यापुढील भागांमध्येही नवनवी वळणे येऊन मालिकेचे कथानक अधिक रंजक होणार आहे. त्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेते आहे. प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरुन प्रेम केले आहे आणि यापुढेही करतील असा विश्वास नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने व्यक्त केला.'ललित २०५' मालिकेतील भैरवी म्हणजे जुन्या नव्या विचारांमधला दुवा. नव्यासोबतच जुन्या रुढी, परंपरा जपणे तिला महत्त्वाचे वाटते. विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी भैरवीचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. यासोबतच घरातल्या थोरामोठ्यांचा सन्मान भैरवीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सासू-सुनेच्या नात्याला तिने मैत्रीचे कोंदण दिले आहे.  

टॅग्स :ललित 205संग्राम समेळ