Join us  

‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा ' नादच खुळा!, 'अशी ही बनवा बनवी' गाण्यावरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 6:12 PM

नितीशने 'अशी ही बनवा बनवी' या गाण्यावर डान्स केला आहे, जो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

‘लागीर झालं जी’ फेम अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येतो आहे. सध्या तो त्याच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील त्याच्या डान्स व्हिडीओमुळे जास्त चर्चेत येतो आहे. त्यामुळे नितीशचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग निर्माण झाला आहे. नुकताच नितीशने अशी ही बनवा बनवी या गाण्यावर डान्स केला आहे, जो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सध्या कोणत्याच मालिकेत काम करताना दिसला नसला तरी तो चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. नितीश सध्या सोशल मीडियावर एकापेक्षा एक दमदार डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या डान्सला चाहत्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

नितीश चव्हाणने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यात तो ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाच्या टायटल साँगवर धमाल डान्स करताना दिसतो आहे. या गाण्यावर त्याच्यासोबत त्याची मैत्रीण श्वेता राजन थिरकताना दिसते आहे. या दोघांची जोडी नेहमीच दमदार डान्स व्हिडीओ शेअर करत असते. 

​‘लागीर झालं जी’ मालिका खूप लोकप्रिय ठरली होती. याच मालिकेतून नितीश चव्हाण घराघरात पोहचला होता. नितीशने साकारलेला 'अज्या' खूप भाव खावून गेला होता. मालिका बंद झाली असली तरीही आजही अज्याला प्रेक्षक विसरलेले नाहीत.अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींना खूपच भावला.

नितीश चव्हाण त्याच्या डॅशिंग लूकमुळेही चर्चेत असतो. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे त्याच्या ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :लागिरं झालं जीनितीश चव्हाण