Join us  

Kushal Punjabi's Death : ​​​​​​​मुलाचा फोटो शेअर केला अन् संपवले जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 12:16 PM

इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती.

ठळक मुद्देकुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले.

टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना कुशलच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. डीटीपी परमजीत सिंह दहिया यांनी कुशलच्या सुसाईड नोटबद्दलचे तपशील शेअर केलेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्महत्येचे  प्रकरण आहे. कुशलचे आईवडिल दुपारपासून आपल्या मुलाशी संपर्क करत होते. पण कुशलचा फोन बंद येत होता. रात्र झाली तरी कुशलशी संपर्क होत नव्हता.  कुशलचे आईवडिल रात्री 10.30 वाजता तो राहत असलेल्या बिल्डींगमध्ये पोहोचले. कुशल त्यावेळी घरात एकटा होता. त्यामुळे आईवडिलांनी दरवाजा तोडला. आत कुशलचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. कुशलच्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे. या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने लिहिले आहे.

चर्चा खरी मानाल तर कुशल आर्थिक संकटात होता. त्याच्याकडे काम नव्हते. आर्थिक तंगीमुळे त्याचे खासगी आयुष्य प्रभावित होत होते.

(अखेरची पोस्ट)

कुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे. कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती.

टॅग्स :कुशल पंजाबीटेलिव्हिजन