Join us  

कुमार सानू लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 1:32 PM

‘यह ऊन दिनोंकी बात है’ जी ९०च्या सुवर्ण युगाचा प्रवास दाखवण्यात येत आहे.  या मालिकेत लवकरच एका नवीन सदस्यला आमंत्रित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालयातील दांडिया कार्यक्रमात ते गायन करणार आहेत

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘यह ऊन दिनोंकी बात है’ जी ९०च्या सुवर्ण युगाचा प्रवास दाखवण्यात येत आहे.  या मालिकेत लवकरच एका नवीन सदस्यला आमंत्रित करण्यात येणार आहे आणि हा कलाकार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, ज्यांनी ९० आणि २० च्या दशकावर आपल्या सुमधुर आवाजाने बॉलीवूड चित्रपट आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले ते कुमार सानू या मालिकेत दिसणार आहेत.

प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. कुमार सानू यांनी 'यह ऊन दिनोंकी बात है'मध्ये सुंदर शीर्षक गीत गायले आहे, ते सगळ्यांना माहिती आहेच. महाविद्यालयातील दांडिया कार्यक्रमात ते गायन करणार आहेत. आगामी ट्रॅकनुसार निवडणूक जिंकल्यानंतर नैना कॉलेजमध्ये दांडिया कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेते आणि अधिकाऱ्यांनाही त्यासाठी तयार करते. या कार्यक्रमात गाण्यासाठी कुमार सानू यांना कॉलेजमध्ये आमंत्रित केले जाणार आहे.

कुमार सानू म्हणाले की, ''मी सुरुवातीपासूनच या सुंदर शोचा एक भाग राहिलो आहे आणि त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. यह ऊन दिनोंकी बात है’ या लोकप्रिय मालिकेचे शीर्षक गाणे हा एक अद्धभूत अनुभव होता आणि पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाचा एक भाग बनणे माझ्यासाठी तितकेच आनंददायी आहे. चांगल्या आणि दर्दी प्रेक्षकांसाठी लोकप्रिय गरबा गीतांसोबत या मालिकेत दिसण्यासाठी मी उत्सुक आहे.'' 

टॅग्स :कुमार सानू