Join us  

होस्ट करण जोहरची भावुक पोस्ट;  ‘Koffee With Karan’ शो होणार बंद!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 2:42 PM

Koffee With Karan : करण जोहरचा  (karan Johar) ‘कॉफी विद करण’ हा चॅट शो लवकरच सुरू होणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यामुळे या शोचे चाहते आनंदात होते. पण ताजी बातमी ‘कॉफी विद करण’च्या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पाडणारी आहे.

करण जोहरचा  (karan Johar) ‘कॉफी विद करण’ (Koffee With Karan) हा चॅट शो लवकरच सुरू होणार, अशी चर्चा काही  दिवसांपासून सुरू होती. यामुळे या शोचे चाहते आनंदात होते. पण ताजी बातमी ‘कॉफी विद करण’च्या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पाडणारी आहे. होय, खुद्द करणने एक निराशाजनक बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  आता हा शो येणार नाही, असं त्याने जाहिर केलं आहे.करणने ‘महत्त्वाची घोषणा’ असं कॅप्शन देत त्यानं एक  भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तो लिहितो, ‘हॅलो, कॉफी विद करणचे सहा सीझन  हे माझ्या आणि आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत. या शो ने प्रत्येकाच्या आयुष्यावर काहीतरी प्रभाव टाकला आहे आणि पॉप कल्चरच्या इतिहासात कुठेतरी एक जागा निर्माण केली आहे. पण मला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, कॉफी विथ करण आता परत येणार नाही.’

‘कॉफी विद करण’चा पहिला भाग २००४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता आणि येताच लोकप्रिय झाला होता. बॉलिवूडचे सेलिब्रिटींसोबत करणच्या गप्पा, चर्चा, मजेशीर खुलासे असं सगळं प्रेक्षकांना भावलं होतं. याचा शेवटचा एपिसोड 17 मार्च 2019 ला टेलिकास्ट झाला होता. मात्र आता हा शो येणार नाही म्हटल्यावर चाहत्यांची निराशा झाली आहे.

खरं तर येत्या जूनपासून ‘कॉफी विद करण’ पुन्हा सुरु होणार, अशीच चर्चा होती. मे महिन्यापासून करण याचं शूटींग सुरू करणार, असा दावाही केला गेला होता. करण सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. यात रणवीर सिंग व आलिया भट मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :करण जोहरकॉफी विथ करण 6