Join us

किश्वरला करायचेत स्टंटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 12:44 IST

छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार नेहमीच रिअॅलिटी शोमध्ये झळकत असतात. किश्वर मर्चंटने बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. बिग बॉसचा अनुभव ...

छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार नेहमीच रिअॅलिटी शोमध्ये झळकत असतात. किश्वर मर्चंटने बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. बिग बॉसचा अनुभव खूपच चांगला असल्याचे तिचे म्हणणे आहे. या कार्यक्रमानंतर आणखी काही रिअॅलिटी शो करायला आवडतील असे तिचे म्हणणे आहे. खतरों के खिलाडी या कार्यक्रमातील स्टंट तर तिला खूप आवडतात. तिला खतरों के खिलाडी या कार्यक्रमात भाग घ्यायला नक्कीच आवडेल असे ती सांगते. रिअॅलिटी शोसोबतच सध्या चित्रपटात काम करण्याचा तिचा विचार सुरू आहे. पण भूमिका चांगली असेल तरच चित्रपट करायचा असे तिने ठरवले आहे. केवळ दोन-तीन दृश्यांत दिसण्यासाठी चित्रपटात काम करण्यात काहीच अर्थ नाही असे ती सांगते.