Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनी YAY वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार किकओ अॅण्ड सुपर स्पीडो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 15:59 IST

सोनी YAY! छोट्या बालगोपालांसाठी किकओ अॅण्ड सुपर स्पीडो हा कार्यक्रम घेऊन आले आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे ...

सोनी YAY! छोट्या बालगोपालांसाठी किकओ अॅण्ड सुपर स्पीडो हा कार्यक्रम घेऊन आले आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे सगळी लहान मुले धमाल मस्ती करत आहे. लहान मुलांना शाळा सुरू असताना अभ्यासाच्या व्यापामुळे खेळायला, टिव्ही पाहायला वेळच मिळत नाही. एकदा सुट्टी आली की, ही लहान मुले आपल्या प्रत्येक हौस-मौज पूर्ण करतात. त्यामुळे खास त्यांच्यासाठी या सुट्टीत या कार्यक्रमाची मेजवानी त्यांच्यासाठी आणण्यात आली आहे. आपल्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती असाव्यात किंवा आपला एखादा मित्र सुपरहिरो असावं, असं आपल्याला मनातून वाटतं नसतं का? समाजातील दृष्टांशी लढा देताना आपण या मित्राची साथ घेऊ, असं नाही वाटत का? आता हे शक्य आहे... सोनी YAY! या उन्हाळ्यात तुमचं हे स्वप्न खरं करणार आहे. तुमच्या भेटीला येत आहे अगदी आपल्याला वाटावा असा, चॅम्पियन, एक मित्र, हिरो... ही वाहिनी सादर करत आहे त्यांची नवी सीरिज ‘किकओ अॅण्ड सुपर स्पीडो’, देशातील एक नवा सुपरहिरो आता तुमच्या भेटीला.अॅक्शन–कॉमेडीने भरलेल्या या नव्या शोमध्ये किकओ आणि त्याची खास गॅझेट कार ‘सुपर स्पीडो’ यांचे साहसी कारनामे पाहता येतील. प्रत्येक भागात ही धाडसी जोडी दृष्ट आणि त्यांच्या गाड्यांचा सामना करेल आणि सन सिटीला संकटातून वाचवेल. मुलांच्या अतिशय आवडीचा विषय म्हणजेच सुपर पॉवर्स... ही कार किकओच्या मनगटावरील ‘आर७’ या घड्याळातून येते. दर भागात उच्च दर्जाचे थ्रीडी अॅनिमेशन आणि खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे हा शो मुलांच्या कल्पनाशक्तीला नक्की चालना देईल.एप्रिलमध्ये आपला पहिला वाढदिवस साजरा करणारे सोनी YAY या उन्हाळ्याची सुरुवात दणक्यात करण्यास सज्ज झाले आहे. हा शो म्हणजे या वर्षीचा त्यांचा एक सर्वात मोठा शो आहे. यातून प्रेक्षकांना डबल मजा, डबल साहस आणि डबल मस्ती मिळणार आहे. ही अॅक्शन–कॉमेडी सोमवार २१ मे पासून दररोज दुपारी १२ वाजता सोनी YAY!वर पाहाता येणार आहे.