Join us  

'के दिल अभी भरा नहीं'; प्रार्थना बेहरेची नेहा कामत म्हणून केलेली शेवटची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 5:09 PM

माझी तुझी रेशीमगाठ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले. आता नेहा कामत या व्यक्तिरेखेचा निरोप घेताना अभिनेत्री भावुक झाली आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली आहे. या मालिकेत प्रार्थना बेहरेने साकारलेली नेहा कामत ही भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेतून प्रार्थना घराघरात पोहचली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले. आता नेहा कामत या व्यक्तिरेखेचा निरोप घेताना अभिनेत्री भावुक झाली आहे. तिने नेहा कामतसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिने नेहा कामतच्या रूपातील एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नेहाला, 'अभि ना जाओ छोडकर, के दिल अभि भरा नहीं' असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल, असं देखील तिने म्हटलं आहे. त्यासोबतच तिने नेहावर भरभरून प्रेम करण्यासाठी प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत.

प्रार्थनाची ही पोस्ट पाहून चाहते देखील भावुक झाले आहेत. या पोस्टवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर 'आम्ही नेहाला खूप मिस करू', 'तुझी आणि परिची खूप आठवण येईल', 'तू कायम आमच्या आठवणीत राहशील' अशा कमेंट केल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या जागेवर दार उघड बये ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. 

टॅग्स :प्रार्थना बेहरे