Join us

'केबीसी'च्या कंटेस्टंटनं शोमध्ये सांगितला सहभागी होण्यामागचा उद्देश, ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 17:35 IST

कौन बनेगा करोडपती शोमध्ये माधुरी रमेश असाटीने फास्टेस्ट फिंगर फर्स्टचं जलद उत्तर देत हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये दमदार खेळत झारखंडच्या दीपज्योतीने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले आहेत. या शोदरम्यान अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की दीपज्योतीने महिन्याला ९ हजार रुपये कमवते. घरात मदत करून बीएससीचा अभ्यासही करते. 

 

कौन बनेगा करोडपती शोमध्ये दीपज्योतीने बिग बींना अॅबेकसही शिकवला आणि त्यावर कॅल्क्युलेशन कसं करायचं हेदखील शिकविलं.

अॅबेकसबद्दल ऐकून अमिताभ बच्चन हैराण झाले होते. कारण त्यांनी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता.  

अमिताभ बच्चन यांनी याशोमध्ये दीपज्योतीचं खूप कौतूक केलं आणि म्हणाले की, तू माझ्यापेक्षा जास्त गुणी आहेस कारण तुला याहूच्या मालकाचं नाव देखील अमिताभ बच्चन यांच्याआधी सांगितलं. दीपज्योतीने शानदार पद्धतीने खेळत २५ लाख रुपये जिंकले.

तिच्यानंतर माधुरी रमेश असाटीने फास्टेस्ट फिंगर फर्स्टचं जलद उत्तर देत हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. माधूरी पेशाने पोस्टल असिस्टंट आहे. माधुरीने सांगितलं की, कौन बनेगा करोडपती या शोमध्ये येण्याचा उद्देश वडीलांचे स्वप्न पूर्ण करणे आहे आणि त्यांची भेट अमिताभ बच्चन यांच्याशी करून द्यायची होती.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन