Join us  

KBC 12: ८० हजार रूपयांच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 11:43 AM

कौन बनेगा करोडपतीमध्ये अरूण कुमार झा यांचा खेळ फार जास्त टिकला नाही. ते केवळ ४० हजार रूपये जिंकण्यात यशस्वी ठरले.

कौन बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. या शोचा १२वा सीझन ऐतिहासिक ठरला आहे. कारण यावेळी तीन स्पर्धक करोडपती झालेत. महत्वाची बाब म्हणजे तीनही करोडपती महिला झाल्यात. पण दुसरीकडे काहींना आपला प्रवास लवकरच संपवावा लागत आहे. असंच काहीसं दिल्लीतील अरूण कुमार झासोबत झालं.

कौन बनेगा करोडपतीमध्ये अरूण कुमार झा यांचा खेळ फार जास्त टिकला नाही. ते केवळ ४० हजार रूपये जिंकण्यात यशस्वी ठरले. ८० हजार रूपयांचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला पण त्यांना उत्तर माहीत नव्हती. त्यांच्या सर्व लाइफलाईनही संपल्या होत्या. त्यामुळे त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला.

८० हजार रूपयांसाठी अमिताभ बच्चन यांनी अरूण कुमार झा यांना प्रश्न विचारला की, द्वितीय महायुद्धानंतर १९४९ मध्ये कोणत्या देशाला दोन भागात विभागण्यात आलं होतं?

A. फ्रान्स

B. ऑस्ट्रिया

C. स्वीडन

D. जर्मनी

या प्रश्नाचं बरोबर उत्तर जर्मनी आहे.

अरूण कुमारचा हा एपिसोड तीन डिसेंबरला प्रसारित झाला होता. ते सुरूवातीपासून लाइफलाईनचा वापर करत गेले आणि त्यामुळे ८० हजार रूपयांच्या प्रश्नावेळी त्यांच्याकडे लाइफलाईनची शिल्लक नव्हती. अरूण यांच्यानंतर कर्मवीर एपिसोडमध्ये डॉ.रविंद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. हे दोघेही गेल्या ३२ वर्षांपासून गरिबांवर उपचार करतात. यासाठी ते केवळ १ रूपया फी घेतात.

अमिताभ बच्चन यांनी दोघांच्याही कामाचं कौतुक केलं. रविंद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे अमरावती जिल्ह्यात राहतात. अनेक वर्षांपासून ते मेळघाटातील बैरागढमध्ये आदिवासी समुदायाची सेवा करत आहेत. ते केवळ १ रूपया घेऊन रूग्णांवर उपचार करतात. तसेच ते लोकांमध्ये जागरूकताही पसरवतात. २०१९ मध्ये दोघांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजन