Join us  

कौन बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशन झाले सुरू... हा आहे पहिला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 6:35 PM

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमासाठी पहिला प्रश्न 1 मे ला सोनी वाहिनीवर पटियाला हाऊस या मालिकेच्या आधी दाखवण्यात आला.

ठळक मुद्देप्रेक्षक ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. प्रेक्षक लँडलाइन/मोबाईल, एसएमएस, ऑनलाइन तसेच सोनीलिव्ह अॅप द्वारे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. 

हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे अकरावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा नुकतीच करण्यात आली. या सिझनचा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. या कार्यक्रमासाठी पहिला प्रश्न 1 मे ला सोनी वाहिनीवर पटियाला हाऊस या मालिकेच्या आधी दाखवण्यात आला. दर्शकांना या कार्यक्रमात प्रवेश घेण्यासाठी पाच प्रश्नांचे योग्य उत्तर द्यावे लागणार आहे. 

 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनसाठी विचारण्यात आलेला पहिला प्रश्न असा आहे की, संस्कृत भाषेपासून निर्माण झालेल्या या कोणत्या शब्दाचा अर्थ स्वागत करणे हा आहे...A नचिकेताB अभिनंदनC नरेंद्रD महेंद्र

प्रेक्षक ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. प्रेक्षक लँडलाइन/मोबाईल, एसएमएस, ऑनलाइन तसेच सोनीलिव्ह अॅप द्वारे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. 

 

‘कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनची टॅगलाईन देखील खूपच छान आहे. अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी (तुम्ही सतत प्रयत्न केला तर या वेळी हॉट सीटवर बसण्याची तुम्हाला नक्कीच संधी मिळेल.) या प्रोमोमध्ये गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी व्हायचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला अमिताभ सल्ला देताना दिसत आहेत. आशा सोडू नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा... असे त्या महिलेला ते सांगत आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे ट्वीटरद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की, मी अमिताभ बच्चन २०१९ मधील एका नवीन अभियानाला सुरुवात करत आहे. कौन बनेगा करोडपती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन