Join us  

KBC: अनुपा दास बनल्या तिसऱ्या करोडपती, पण ७ कोटीच्या क्रिकेटसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो!

By अमित इंगोले | Published: November 26, 2020 9:01 AM

KBC 12: नाझिया नसीम आणि मोहिता शर्मा यांच्यांतर आता अनुपा दास यांनीही १ कोटी रूपये आपल्या नावावर केले आहेत.

कौन बनेगा करोडपतीचा १२वा सीझन फारच रोमांचक आणि चांगला ठरत आहे. या सीझनमध्ये तीन महिलांनी करोडपती होऊन इतिहास रचला आहे.  नाझिया नसीम आणि मोहिता शर्मा यांच्यानंतर आता अनुपा दास यांनीही १ कोटी रूपये आपल्या नावावर केले आहेत. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत हा विजय मिळवला. अनुपा यांनी फारच चांगला खेळ समजदारीने खेळला. 

त्यांच्या समजदारीमुळेच त्या एक कोटी रूपयांच्या कठिण प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या. आता प्रश्न एक कोटीचा होता त्यामुळे अर्थातच कठिण असणार होता. 

प्रश्न - १८ नोव्हेंबर १९६२ ला लडाखच्या रेजांग ला मध्ये कुणाला त्यांच्या बहादुरीसाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते?

अर्थातच प्रश्न अनुपा यांच्यासाठी कठीण वाटत होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी ५०-५- लाइफलाईनचा वापर केला. त्यातून त्यांनी मेजर शैतान सिंह हे उत्तर दिलं. अमिताभ बच्चन यांनी थोडावेळ सस्पेन्स कायम ठेवला, पण नंतर थेट सांगितलं की, अनुपा दास यांनी एक कोटी रूपये आपल्या नावावर केले आहेत. केवळ इतकंच नाही तर अनुपा यांनीही पूर्ण आत्मविश्वासाने या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, त्यांना १०० टक्के या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं. ( KBC 12 : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?)

त्यांच्या या अंदाजाने अमिताभ बच्चन चांगलेच इम्प्रेस झाले. त्यांनी त्यांचा खेळ अद्बूत असल्याचं सांगितलं आणि त्यांच्या खेळाचंही कौतुक केलं. अमिताभने अनुपा यांच्या कौतुकात हेही सांगितलं की, त्या तर विना लाइफलाईनही एक कोटी रूपये आपल्या नावावर करू शकल्या असत्या. आता या पैशातून अनुपा यांना अनेक स्वप्ने पूर्ण करायची आहेत. त्यांना आईवर उपचार करायचे आहे आणि शाळेतील मुलींसाठी काही खास करायचं आहे. ('जंजीर' सिनेमासाठी सलीम-जावेद यांनी अमिताभ यांना का निवडलं? च्युईंगमसोबत आहे कनेक्शन....)

एक कोटी रूपये जिंकल्यावर अमिताभ बच्चन यांनी अनुपा यांना ७ कोटी रूपयांचा प्रश्न विचारला. हा एक क्रिकेटसंबंधी प्रश्न होता. मात्र, या प्रश्नाचं उत्तर अनुपा यांना माहीत नव्हतं. 

प्रश्न - रिया पूनावाला आणि शौकंत दुकानवालाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे?

आश्चर्याची बाब म्हणजे अनुपा यांनी या प्रश्नाच्या उत्तराचा अगदी बरोबर अंदाज लावला होता. पण त्यांना पूर्णपणे विश्वास नसल्याने त्यांनी शो क्विट केला. तसं या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं यूनायटेड अरब अमीरात. जर त्यांनी लावलेला अंदाज लॉक केला असता तर त्या ७ कोटी रूपये जिंकल्या असत्या. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजन