Join us  

अरे देवा, शाहरुख खानच्या चाहतीने लाईव्ह शोमध्येच अमिताभ बच्चनवर यांच्यावर व्यक्त केली नाराजी, कारण वाचून हसून हसून लोटपोट व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 10:40 AM

'पठान' यशराज बॅनर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. यात जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका पादुकोण सिनेमात शाहरुखची हिरोईन असणार आहे.

टीव्हीचा लोकप्रिय गेम शो कौन बनेगा करोडपतीचा 12 वा सीझनलाही रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे. नुकतेच या शोमध्ये दिल्लीची रेखा राणी स्पर्धक सहभागी झाली होती. हॉटसीटवर आल्यानंतर प्रत्येकजण अमिताभ यांच्या समोर बसणेही आपले भाग्य समजतो. मात्र रेखा राणी यांनी अमिताभ यांना पाहून आनंद व्यक्त केला नाही तर उलट अमिताभ यांच्यावर त्या रागवल्या.

अमिताभ यांनी त्या रागात असल्याचे समजताच कारण विचारले तर या गोष्टीला कारणीभूत शाहरुख खान होता. वास्तविक, रेखा राणी ही शाहरुख खानची मोठी चाहती आहे आणि अमिताभ यांनी एका चित्रपटामध्ये शाहरुखला फटकारले होते. चित्रपटात शाहरूखला अमिताभ यांचे असे वागणे आवडले नाही. म्हणून त्या अमिताभ यांच्यावर प्रचंड चिडल्या होत्या. वाचून थोडे आश्वचर्य वाटलेच असणार पण शेवटी बादशाह किंग खानची चाहती होती.

शाहरुखच्याप्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात असतेच तसेच काहीसे रेखा राणीबद्दलही घडले आहे. शाहरुखच्या फॅनवर आधारित एक सिनेमाही रुपेरी पडद्यावर झळकला. यातील ''जबरा फॅन हो गया'' हे गाणं तर बॉलीवुडच्या बाहशाहच्या प्रत्येक फॅनसाठी तंतोतंत लागू पडतं. शाहरुखच्या अशा अनेक जबरा फॅनचा किस्सा बी टाऊनमध्ये सतत चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. किंग खान शाहरुखचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. मात्र या सगळ्या फॅन्सपैकी एक फॅन या रेखा राणी शाहरुखच्या ख-या अर्थाने जबरा फॅन ठरली आहे.

 

पुढच्या वाढदिवसाच्या आधी मोठ्या स्क्रीनवर परतण्याचे फॅन्सना दिले वचन

अभिनेता शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना असे आश्वासन दिले आहे की तो त्याच्या पुढच्या वाढदिवसाच्या आधी मोठ्या स्क्रीनवर परत येईल. हे वचन पूर्ण करण्यासाठी तो या महिन्यात सेटमध्ये परत येणार आहे. हा सिनेमा आहे 'पठान'. यशराज बॅनर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. यात जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका पादुकोण सिनेमात शाहरुखची हिरोईन असणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन