Join us

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीला 'बिग बॉस 13'ची ऑफर, 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेतून घेणार ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:15 IST

या शोमध्ये कॉमनर्सना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यावर्षी बिग बॉस 13 मध्ये फक्त सेलिब्रिटी लोक पाहायला मिळणार आहेत.

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस' विविध कारणांमुळे चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद, कुरघोडीची स्पर्धा, डावपेच, टास्क आणि कधी इमोशनल ड्रामा यामुळे रसिकांना हा शो भावतोय. त्यामुळे पुन्हा एकदा 'बिग बॉस 13'  सिझन सुरू होणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणकोणते चेहरे झळकणार याकडेच सा-यांच्या नजरा लागल्या आहेत. सहभागी होणा-या स्पर्धकांची अधिकृत नावे समोर आली नसली तरीही त्यापैकी एका स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी 'बिग  बॉस 13' सिझनमध्ये सहभागी होणार असल्याचे समजतंय. विशेष म्हणजे या शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिने 'कसौटी जिंदगी की  2' मालिका सोडली असल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेऊन यावर्षी येणाºया बिग बॉस 13 मध्ये निर्मात्यांनी एक मोठा बदल केला आहे.

सेलिब्रिटी  आणि कॉमनर्स  यांच्या थीमवर आधारित हा लोकप्रिय शो  मागच्या वर्षी दर्शकांचे मनोरंजन करू शकला नाही. यावर्षी या शोमध्ये कॉमनर्सना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यावर्षी बिग बॉस 13 मध्ये फक्त सेलिब्रिटी लोक पाहायला मिळणार आहेत.

तसेच नेहा कक्करचा एक्स-बॉफ्रेंड हिमांश कोहली या शोमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच यावर्षी नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या ब्रेकअपने चांगलीच प्रसिध्दी मिळवली होती. त्यामुळे या दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणामुळे खटके उडले आणि त्यांचे ब्रेकअप झाले असावे या सगळ्या गोष्टी बिग बॉस 13 च्या माध्यमातून चाहत्यांना कळणार हे मात्र नक्की. त्यामुळे यंदाचा बिग बॉसचा 13 सिझन धमाकेदार असणार हे मात्र नक्की. 

टॅग्स :पूजा बॅनर्जी