Join us

​ कृतिका चौधरीची हत्याच; दया नायक करणार तपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 11:32 IST

अभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचे शेवटी उघड झाले. अंबोली पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कृतिकाच्या मृतदेहावर ...

अभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचे शेवटी उघड झाले. अंबोली पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कृतिकाच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. हत्येपूर्वी तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर पाच बोटात घातल्या जाणाºया तीक्ष्ण पंजाद्वारे तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक चौकशीअंती या दोघांना तब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.कृतिकाच्या हत्येचा हा गुंता सोडवण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकला सोपवली आहे  एसपी अरुण चव्हाण यांनी सांगितल्यानुसार,या प्रकरणाचा तपास करणाºया टीमकडे अनेक लीड्स आहेत आणि त्याआधारेच तपास सुरू आहे. अनेकांची चौकशी केली असून इतरही अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मृतदेह सोमवारी मुंबईच्या अंधेरीमधील चार बंग्लो परिसरातील भैरवनाथ बिल्डींगमध्ये   कृतिका चौधरीचा आढळला होता. कृतिका घरात एकटीच राहायची. घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाºयांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिस दरवाजा तोडून आत पोहोचले तेव्हा टीव्ही व एसी आॅन होता. बाजूलाच कृतिकाचा मृतदेह पडला होता.  कृतिका ही मूळची उत्तराखंडच्या हरिद्वारची होती. यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते आणि यासाठीच ती मुंबईत आली होती. कृतिका ही मूळची उत्तराखंडच्या हरिद्वारची. ‘रज्जो’ या चित्रपटात तिने कंगना राणौतसोबत काम केले होते. याशिवाय २०११ मध्ये बालाजी टेलिफिल्मच्या ‘परिचय’ या मालिकेतही ती दिसली होती.