Join us

करण सोडणार मालिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 12:22 IST

ये है मोहोब्बते या मालिकेतील रमण आणि इशिताची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. पण गेली कित्येक दिवस या मालिकेत या ...

ये है मोहोब्बते या मालिकेतील रमण आणि इशिताची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. पण गेली कित्येक दिवस या मालिकेत या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. मालिकेची कथा केवळ शगुन आणि इशिता या दोघांच्या अवतीभवतीच फिरत असल्याचे दिसत आहे. कथानकात केलेल्या या बदलामुळे फॅन्स तर रागावलेले आहेत. पण त्याचसोबत या मालिकेत रमणची भूमिका साकारणारा करण पटेल यालादेखील हा बदल रुचलेला नाही आणि त्यामुळे त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेत रमणच्या व्यक्तिरेखेला काहीच महत्त्व राहिले नसल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. करणची याबाबत प्रोडक्शन हाऊससोबत काही चर्चादेखील झाली होती. पण या चर्चांमधून काहीच निष्पन्न निघाले नसल्याने त्याने मालिका सोडण्याचे ठरवले आहे. करणने नुकत्याच केलेल्या ट्वीटवरून तो मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मालिकेत माझी वयक्तिरेखा नसली तरी ये है मोहोब्बतेसोबतचे माझे नाते काही तुटणार नाहीये.