Join us  

म्हणे, हा काही उपाय नाही...! कपिल शर्माने केली सिद्धूची पाठराखण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 1:06 PM

एका चॅनलशी बोलताना कपिल सिद्धूची अप्रत्यक्षपपणे पाठराखण करताना दिसला.

ठळक मुद्दे नवज्योत सिंग सिद्धची अशाप्रकारे पाठराखण केल्यामुळे कपिल शर्मा हा सुद्धा नेटक-यांच्या निशाणावर आला आहे. नेटकºयांनी कपिलला धारेवर धरले असून ‘बायकॉट कपिल शर्मा शो आणि कपिल-सिद्धू को हटाओ’ सारखे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आहेत.

नवज्योत सिंग सिद्धूला पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर बोलणे महागात पडले. दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’ अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडला आणि ‘द कपिल शर्मा’ शोमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्याच्या जागी या शोमध्ये अर्चना पूरण सिंगची वर्णी लागली. सोनी टीव्हीने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर तिच्या नावाची अधिकृत घोषणाही केली. पण सिद्धूला खरोखरचं या शोमधून बाहेर काढण्यात आले की केवळ काही एपिसोडसाठी अर्चनाला आणले गेले, हे सोनीने अद्यापही स्पष्ट केलेले नाही. आता याही कारणाने नेटकरी संतापले आहेत. याचा परिणाम म्हणजे, ट्विटरवर ‘अनसब्सक्राईब सोनी टीव्ही’ही मोहिम जोरात सुरु आहे. अशात  ‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट कपिल शर्मा याने या संपूर्ण वादावर चुप्पी तोडत, नवज्योत यांना शोबाहेर काढलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.एका चॅनलशी बोलताना कपिल सिद्धूची अप्रत्यक्षपपणे पाठराखण करताना दिसला. नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्या राजकीय कामात बिझी आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंग हिला घेण्यात आले. तशीही ही फार मोठी गोष्ट नाही. काही लोक सोशल मीडियावर प्रोपोगंडा करत आहेत. पण नवज्योत सिंग सिद्धूला शो बाहेर करणे, हा काही उपाय नाही. भारत- पाकिस्तान यांच्यात जो वाद सुरु आहे, त्यावर स्थायी तोडगा काढला जायला हवा, असे कपिलने म्हटले. पुलवामा हल्ला निश्चितपणे भ्याड आहे. या हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी. आम्ही सगळे सरकारसोबत आहोत. पण यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा, असेही तो म्हणाला.दरम्यान नवज्योत सिंग सिद्धची अशाप्रकारे पाठराखण केल्यामुळे कपिल शर्मा हा सुद्धा नेटक-यांच्या निशाणावर आला आहे. नेटक-यांनी कपिलला धारेवर धरले असून ‘बायकॉट कपिल शर्मा शो आणि कपिल-सिद्धू को हटाओ’ सारखे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आहेत.

 

टॅग्स :कपिल शर्मा नवज्योतसिंग सिद्धूपुलवामा दहशतवादी हल्ला