‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपट ते ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’पर्यंत कंगना शर्माचा पाहायला मिळणार दीर्घ प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:51 IST
सुंदर आणि चाणाक्ष सौंदर्यवती तारका कंगना शर्मा टीव्ही मालिकांमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील मदनमस्त तारका कंगनाने ...
‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपट ते ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’पर्यंत कंगना शर्माचा पाहायला मिळणार दीर्घ प्रवास
सुंदर आणि चाणाक्ष सौंदर्यवती तारका कंगना शर्मा टीव्ही मालिकांमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील मदनमस्त तारका कंगनाने आता ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ या स्टार प्लसवरील मालिकेत भूमिका साकारण्यासाठी करार केला आहे.शशी सुमित प्रॉडक्शन्सच्या ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ या मालिकेत एका नकारात्मक भूमिकेसाठी कंगनाला करारबध्द करण्यात आले आहे.तिच्या प्रवेशामुळे मालिकेच्या कथानकाला नवे वळण लागणार असून कनक आणि उमाशंकरचे जीवन पालटून जाणार आहे.“टीव्ही मालिकेत मी प्रथमच भूमिका साकारणार असल्याने मला त्याची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.या मालिकेसाठी करार केल्यानंतर मी ही मालिका नियमितपणे पाहात असून तिच्या चित्रीकरणाचा आम्ही लवकरच प्रारंभ करू.प्रेक्षकांना माझी भूमिका आणि माझं काम आवडेल, अशी आशा करते,” असे कंगना म्हणाली.Also Read:कंधारीचा ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’मध्ये दिसणार नवा अवतार!‘दिया और बाती हम’ मालिकेत अर्पिता खन्नाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री रिशिना कंधारी ही आता ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ मालिकेत पुन्हा भूमिका एंट्री करणार आहे.याआधी रिशिनाने या मालिकेत पोलिस आयुक्तांची भूमिका साकारलेली होती. अभिनेत्री या मालिकेत आता एका खंबीर राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसेल.तिच्या प्रवेशामुळे मालिकेच्या आगामी भागांना नवे वळण मिळणार आहे.आपल्या प्रवेशाबद्दल रिशिना म्हणाली,“या मालिकेत मी एका नव्या अवतारात दिसेन.पण मला माझा गणवेश आवडायचा,त्यात मला मी पुरुष असल्याची भावना येत असे.त्यात मी माझी देहबोली स्वत:च ठरवली होती आणि सारे स्टंट मीच साकारले होते.तेव्हा मी बंदूक चालवायलाही शिकले होते.”ती म्हणाली, “अर्पिता खन्नाच्या व्यक्तिरेखेने मला एक वेगळंच समाधान दिलं होतं.आता जेव्हा ती एक राजकीय पुढारी बनेल,तेव्हाही ती आपली जादू पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी मी सज्ज आहे.याबद्दल मला खात्री आहे.म्हणून आता मी त्याच भावनेनं पण वेगळ्या वेशात या मालिकेत सहभागी होत आहे.”