Join us

या कारणामुळे पुरस्कार सोहळ्यांना कांची क्वचितच उपस्थित राहते- शब्बीर अहलुवालिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 06:30 IST

झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांची यंदा अनेकरंगी करमणूक होणार असून, नामवंत कलाकारांनी सादर केलेले नाट्यप्रसंग, नृत्ये, विनोदी चुटके आणि इतर बरेच काही पाहायला मिळणार आहे.

गेली 26 वर्षे अप्रतिम मालिका, संस्मरणीय कथा आणि प्रेम करण्याजोग्या व्यक्तिरेखा यांच्याद्वारे ‘झी टीव्ही’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आघाडीवर आहे. ‘कुमकुम भाग्य’ या विलक्षण लोकप्रिय मालिकेत गेली अनेक वर्षे अभिषेक प्रेम मेहरा ऊर्फ अभी ही व्यक्तिरेखा साकारीत असलेल्या शब्बीरने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. गेल्या चार वर्षांत या मालिकेने केवळ प्रेक्षक पसंतीच्या निकषांवरच नवे मापदंड निर्माण केले आहेत असे नव्हे, तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या व्यक्तिरेखा आणि मन गुंतवून ठेवणाऱ्या कथानकामुळेही ही मालिका विशेष लोकप्रिय राहिली आहे. झी रिश्ते पुरस्कारांमध्ये प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकार आणि मालिकेसाठी मतदान करतात आणि गेल्या काही वर्षांत कुमकुम भाग्य ही मालिका आणि शब्बीर अहलुवालियानेच यापैकी बहुतेक महत्त्वाचे पुरस्कार पटकाविले आहेत. 

यंदाचे वर्षही त्याला अपवाद नव्हते; कारण यंदा शब्बीरने सर्वोत्कृष्ट बेटाचा पुरस्कार पटकाविला आहे. यामुळे आनंदित झालेल्या शब्बीरने सांगितले, “मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कुमकुम भाग्यची सारी टीम, झी टीव्ही आणि माझे निष्ठावंत चाहते यांचा मनापासून आभारी आहे. माझी पत्नी कांची कौल ही पुरस्कार सोहळ्यांना क्वचितच उपस्थित राहते. आज ती माझ्याबरोबर या सोहळ्यास आली असून तिची उपस्थिती माझ्यासाठी लाभदायक सिध्द झाली आहे. त्यामुळेच मी हा पुरस्कार कांची आणि माझी मुलं अझाई आणि इवार यांना अर्पण करीत आहे. कांची आणि माझी मुलं हीच माझा प्रेरणास्रोत आहेत.”

झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांची यंदा अनेकरंगी करमणूक होणार असून, नामवंत कलाकारांनी सादर केलेले नाट्यप्रसंग, नृत्ये, विनोदी चुटके आणि इतर बरेच काही पाहायला मिळणार आहे. अभी आणि प्रज्ञा (शब्बीर आणि श्रृती झा) या टीव्हीवरील सर्वांच्या लाडक्या युगुलाने सादर केलेले रोमँटिक गीत प्रेक्षकांना स्वप्नांच्या दुनियेत घेऊन गेले; तर करण आणि प्रीती (धीरज धूपर-श्रध्दा आर्य) या टीव्हीवरील सध्याच्या सर्वात लाडक्या जोडप्याने आँख लड जावे, बिंते दिल आणि मुझे चाँद पे ले चलो या तीन गाण्यांवर सादर केलेल्या रोमँटिक नृत्यनाट्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच धीरज धूपर आणि रवी दुबे या सूत्रसंचालकांच्या खुसखुशीत टिप्पणीने प्रेक्षकांना गुदगुल्या होत होत्या. याशिवाय ‘सा रे ग म पा’ कार्यक्रमातील परीक्षक वाजित खान आणि सोना मोहपात्रा यांनी सादर केलेल्या तेरा हिरो इधर है  आणि जिया लागे ना  या गाण्यांनी आणखीनच रंगत आणली होती.