Join us

जिमी शेरगिल ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 19:34 IST

अनलिमिटेड फन अशी ओळख असलेल्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आले आहे. आठवड्याच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड ...

अनलिमिटेड फन अशी ओळख असलेल्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आले आहे. आठवड्याच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी या मालिकेत हजेरी लावत असतात. आता अभिनेता जिमी शेरगिल मालिकेत एंट्री करणार असून, त्याचा अंदाज बघण्यासारखा असेल. जिमी मालिकेत ‘तनु वेड्स मनू’मधील अवस्थीच्या भूमिकेत त्याच्या वधूचा शोध घेणार आहे. त्यामुळे या दरम्यान घडणाºया घडामोडी या मालिकेत नवे ट्विस्ट निर्माण करतील. दरम्यान, मालिकेत विभूतीने (आसिफ शेख) ‘मॅरेज ब्यूरो’ सुरू केले असून, त्या माध्यमातून अवस्थीच्या वधूचा शोध घेतला जाणार आहे; मात्र अवस्थीबाबत सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे तो ज्या मुलीशी विवाह करण्याचा विचार करतो, त्या मुलीचे अगोदरच दुसºया मुलाशी अफेयर असते, त्यामुळे ऐन लग्नाच्या दिवशीच ती मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जाते.  या एपिसोडमध्ये विभूती जिमी शेरगिलची मदत करताना बघावयास मिळणार आहे; मात्र अखेरीस ज्या पद्धतीच्या घडामोडी समोर येतात त्या बघण्यासारख्या आहेत. विनोदी शैलीच्या या घडामोडी प्रेक्षकांना नक्कीच हसून-हसून लोटपोट करतील. जिमीच्या या एपिसोडबाबत विभूती म्हणजेच आसिफने सांगितले की, जिमीबरोबर शूटिंग करणे खरोखरच आनंददायी होते. तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्यासोबत शूटिंग करणे मजेशीर होते. आम्ही मालिकेत खूप धमाल केली असून, आमच्यातील केमिस्ट्रीही चांगली जुळली आहे. यापूर्वीही मालिकेत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावून धमाल केली आहे.