Join us

मल्हार – अंतराच्या नात्याला मिळणार नवं वळण ? जीव माझा गुंतला मालिकेत पाहायला मिळणार रंजक घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 17:27 IST

. मल्हारने त्याच्या होणार्‍या बायकोसोबत ही पूजा करणं अपेक्षित आहे. चित्रा काकी या होणार्‍या पूजेमध्ये काही ना काही कुरघोड्या करते आहे, जेणेकरून पूजा निर्विघ्नपणे पार पडू शकणार नाही.

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा असतो. जीव माझा गुंतला मालिकेमध्ये मल्हार आणि श्वेताचं लग्न ठरले आहे. लग्नानंतरचे दोघांचे आणि त्याआधी दोघांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची संकट येऊ नये म्हणून पूजा केली जाते. आणि म्हणूनच मल्हारच्या पत्रिकेतील दोषाच निवारण करण्यासाठी खानविलकर कुटुंब तुलादान आणि पूजेची योजना आखतात. मल्हारने त्याच्या होणार्‍या बायकोसोबत ही पूजा करणं अपेक्षित आहे. चित्रा काकी या होणार्‍या पूजेमध्ये काही ना काही कुरघोड्या करते आहे, जेणेकरून पूजा निर्विघ्नपणे पार पडू शकणार नाही. 

चित्रा काकीच्या अश्या विचित्र वागणुकीमुळे मल्हार थोडा गोंधळलेला आहे. ती अशी का वागते आहे याचं नेमकं कारण अजून मल्हारला माहिती नाही. पण, काकीने ठरवले आहे श्वेताच सत्य ती संपूर्ण कुटुंबासमोर आणणार. दुसरीकडे, पूजा सुरू असतानाच मेघ श्वेताला फोन करतो आहे कारण त्याला तिला भेटायचे आहे. श्वेता मेघला भेटायच्या तयारीतच आहे, अंतराला खोट सांगून श्वेता मेघला भेटायला जाते आणि इकडे मल्हारसोबत तुला दान आणि पूजेचा खूप महत्वाचा भाग म्हणजे प्रदक्षिणा अंतरा मल्हारसोबत पूर्ण करते. 

येत्या शनि आणि रवी भागामध्ये तुला दान पूजेचा खूप महत्वाचा भाग पुन्हा एकदा अंतरामुळेच पूर्ण होणार आहे. नक्की काय घडणार आहे ? काय असणार आहे तो भाग ? नियती कुठेतरी हे तर संदेश देत नाहीये ना की मल्हार आणि अंतरा एकत्र यावे. काय आहे नियतीच्या मनात ? चित्रा काकी श्वेताचं पूर्ण कुटुंबाच्या समोर आणू शकेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी भागात रसिकांना पाहायला मिळतील.