Join us

जय जय स्वामी समर्थ मालिकेतील अभिनेत्यासह विवाहबंधनात अडकली ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:24 IST

'क्राईम पेट्रोल', 'सावधान इंडिया' या हिंदी मालिकेत छोट्या पण तितक्याच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा सनईचे सूर ऐकायला मिळाले. छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी. कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.अशीच कलाकाराची एक जोडी म्हणजे जय जय स्वामी समर्थमालिकेतील अभिनेता अनुज ठाकरे अश्विनी गोरलेसह विवाहबंधनात अडकला.

पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला.नागपुरमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री विजया बाबर, जान्हवी किल्लेकर, पूजा रायबागी तसेच चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे यांनी अनुजच्या लग्नाला हजेरी लावून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. अश्विनीसुद्धा एक अभिनेत्री आहे.सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.चाहते दोघांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती व्हायरल झालेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. या फोटोंमध्ये नववधू अश्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. यावेळी नववधू वरासह साऱ्यांच्याच नजरा दोघांवर खिळल्याचे पाहायला मिळत आहे. 

अभिनेता अनुज ठाकरे या मालिकेआधी कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमध्येही झळकला आहे. आपल्या विनोदी स्किट्स सादर करत त्याने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले.यानंतर 'क्राईम पेट्रोल', 'सावधान इंडिया' या हिंदी मालिकेत छोट्या पण तितक्याच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.