Join us  

जस्मिन भसिनला अशाप्रकारच्या मालिका भावत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 7:15 AM

अभिनेत्री जस्मिन भसीनने म्हटले आहे की सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या अमानवी शक्तींवर आधारित मालिका तिला पटत नाहीत. 

ठळक मुद्दे हॅप्पी ही स्वच्छंद आणि आणि आनंदी वृत्तीची तरूण मुलगी चरित्र भूमिका रंगविण्याला जस्मिनचे प्राधान्य

स्टार प्लसवरील 'दिल तो हॅप्पी है जी' या मालिकेत हॅप्पी मेहराची भूमिका साकारीत असलेली अभिनेत्री जस्मिन भसीनने म्हटले आहे की सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या अमानवी शक्तींवर आधारित मालिका तिला पटत नाहीत. आपल्यातील अभिनेत्रीला आव्हान देतील अशा चरित्र भूमिका रंगविण्याला जस्मिन प्राधान्य देते. 

जस्मिन सध्या साकारीत असलेली हॅप्पी ही स्वच्छंद आणि आणि आनंदी वृत्तीची तरूण मुलगी असून ती कोणत्याही परिस्थितीत आनंदच शोधते. आपल्या भूमिकेविषयी जस्मिन म्हणाली, 'तुम्ही दैनंदिन मालिकेत एखादी भूमिका रंगवीत असाल, तर ती व्यक्तिरेखा तुमच्या जीवनात दीर्घ काळ राहते. यापूर्वी मी साकारीत असलेल्या एका गुजराती मुलीच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव माझ्या मनावर जवळपास दीड वर्षं टिकला होता. तो मी निग्रहाने दूर केला, तेव्हा मला सध्याच्या भूमिकेत शिरता आले. या हॅप्पीचा स्वभाव माझ्या मूळ स्वभावासारखाच आहे.'

अमानवी शक्तींवरील मालिकांबाबत जस्मिन म्हणाली, 'अमानवी शक्ती किंवा भूत-पिशाच्च यासारख्या मालिकांमध्ये मी कधी भूमिका साकारीन असं मला वाटत नाही कारण माझा त्यावर विश्वासच नाही. मी सध्या ज्या प्रकारच्या भूमिका रंगविते आहे, त्याच माझ्यासाठी योग्य आहेत.'

जस्मिन भसीनला हॅप्पीच्या भूमिकेत 'दिल तो हॅप्पी है जी'मध्ये सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता फक्त स्टार प्लसवर पहा.

टॅग्स :जास्मीन भसीनस्टार प्लस