Join us

इशिताचे होणार रॅगिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 15:50 IST

ये है मोहोब्बते या मालिकेच्या कथानकाला सध्या नवीन वळण मिळालेले आहे. इशिताने ऑफिस सांभाळायचे ठरवले आहे तर रमण आता ...

ये है मोहोब्बते या मालिकेच्या कथानकाला सध्या नवीन वळण मिळालेले आहे. इशिताने ऑफिस सांभाळायचे ठरवले आहे तर रमण आता घर सांभाळणार आहे. पण ऑफिस सांभाळताना इशिताला व्यवसायात खूप मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे धंद्याचे डावपेच शिकण्याासाठी ती त्यासंबंधित शिक्षण घ्यायचे ठरवणार आहे. पण कॉलेजमधील मुले तिला आंटी बोलून सतवणार आहे. एवढेच नाही तर ते तिची रॅगिंगही करणार आहेत. पण इशिता या सगळ्या गोष्टींना तोंड देणार आहे आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आहे.