Join us  

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक; किडनी फेल, कुटुंबाकडे उपचारासाठी नाहीत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 3:27 PM

अनाया सध्या डायलिसिसवर आहे. पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अनायावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.

'मेरे साई' या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनीची प्रकृती बिघडली आहे. अनाया 'मेरे साई'च्या सेटवर शूटिंग करत असताना अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि शूटिंग थांबवण्यात आले. अनाया सोनीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आता समोर येत आहे. 'आज तक'च्या रिपोर्टनुसार, अनायाच्या वडिलांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनायाची एक किडनी खराब झाली आहे. 

अनाया सध्या डायलिसिसवर आहे. पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अनायावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मुलीची किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणणार याची चिंता अनायाच्या वडिलांना सतावत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या स्थितीबद्दल सांगितले आहे. “डॉक्टर सांगत आहेत की माझी किडनी निकामी झाली आहे आणि मला डायलिसिसवर जावे लागेल. माझे क्रिएटिनिन 15.67 पर्यंत खाली आले आहे आणि हिमोग्लोबिन 6.7 आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.”

“सोमवारी अंधेरी पूर्व येथे असलेल्या होली स्पिरिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा माझं जीवन सोपं नाही. पण मी सहजतेने जगण्याचा प्रयत्न करत आहे. वेळ येणार होती, हे मला माहीत होतं. मी लवकरच किडनी प्रत्यारोपण करणार आहे. मी डायलिसिसनंतर किडनीसाठी अर्ज करेन” असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनाया सोनी यापूर्वी आजारी पडली आहे. तिचे कुटुंब दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करत आहे. 

अनाया सोनीने 2021 मध्ये आर्थिक मदत मागितली होती. 2015 पासून ती फक्त एकाच किडनीवर जगत असल्याचंही समोर आलं आहे. काही वर्षांपूर्वी अनाया सोनीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एक किडनी दिली होती. पण दिलेली किडनीही निकामी झाली. 'मेरे साई' व्यतिरिक्त अनाया सोनीने इतर काही टीव्ही शोमध्ये काम केले आहे. यामध्ये 'इश्क में मरजावां', 'है अपना दिल तो आवारा' आणि 'अदालत' सारख्या शोचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :टेलिव्हिजन