Join us  

इशा केसकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, सोशल मीडियावर झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 12:20 PM

तिने आपल्या मनातल्या दडलेल्या भावनानंही वाट मोकळी करून दिली आहे. इशा केसकर प्रचंड अस्वस्थ झालीय. सगळ्या गोष्टी एकामागून एक तिच्या डोळ्यासमोर तरळून जातात.

मराठी अभिनेत्री इशा केसकरच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इशाने याबद्दलची माहिती दिली. इशाचे वडील चैतन्य केसकर यांनी २४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अनेकदा इशा तिच्या वडिलांसह सोशल मीडियावर फोटो शेअर करायची. बाप लेकीमध्ये घट्ट बॉन्डींगही पाहायला मिळाले.

 

बालपणापासूनच्या गोष्टी ते आतापर्यंत इशाने आनंदाचे क्षण सोशल मीडियालर शेअर करताना दिसली. तिचे वडिलांसह खूप चांगले ट्युनिंग होतं. मात्र  वडिलांच्या निधनाने इशासह संपूर्ण  केसकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

खुद्द इशाने  सोशल मीडियावर तिच्या वडिलांसह असेलला फोटो शेअर करत या दुःखद बातमी दिले. या फोटोमधून तिने आपल्या मनातल्या दडलेल्या भावनानंही वाट मोकळी करून दिली आहे. इशा  प्रचंड अस्वस्थ झालीय.. सगळ्या गोष्टी एकामागून एक तिच्या डोळ्यासमोर तरळून जातात.

 

इशा केसकरने का सोडली ‘माझ्या नव-याची बायको’ मालिका? जाणून घ्या कारण

लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले. याच काळात इशाच्या दाढेचे ऑपरेशन झाले. दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुहे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते. अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने व्हिडीओ याची माहिती दिली आहे.

‘माझ्या नवºयाची बायको’मालिका सुरु झाली तेव्हा रसिका सुनील हिने शनायाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतली होती. मात्र शिक्षणासाठी परदेशात गेल्याने रसिकाने ही भूमिका अचानक सोडली होती. तिने मालिका सोडल्याने प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाली होती. रसिकाने ही मालिका सोडल्यानंतर तिची जागा इशा केसकरने घेतली होती.

टॅग्स :ईशा केसकरमाझ्या नवऱ्याची बायको