Join us

अत्याचारा विरोधात आवाज उठवा परमसिंहचे महिलांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 16:28 IST

‘गुलाम’ या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली आहेत.त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही मालिका आपल्या समाजातील ...

‘गुलाम’ या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली आहेत.त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही मालिका आपल्या समाजातील काही सत्यघटनांवर आधारित असून त्यातील काही प्रसंग आजवर उघड करण्यात आले नव्हते. म्हणूनच महिलांवरील बलात्कार, त्यांचे मुंडन करणे वगैरे अत्याचार सहसा नोंदले जात नसले, तरी ते अत्याचार जाहीर करण्यास आता गुलाम मालिकेद्वारे एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या मालिकेत गुलामाची भूमिका रंगविणारा अभिनेता परमसिंह सांगतो की या मालिकेमुळे महिलांवर कशा प्रकारचे अत्याचार  होत असतात, त्याची आता आपल्याला कल्पना आली आहे. “ही भूमिका रोजच्या रोज साकारीत असल्यामुळे महिलांवरील हे अत्याचार किती गंभीर स्वरूपाचे आहेत, त्याची मला कल्पना आली आहे.असे भीषण अत्याचार आजही समाजात महिलांवर होत असल्याने अस्वस्थ व्हायला होते.पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की महिलांवर इतके अत्याचार होत असतानाही त्यांची सरकारदरबारी दखल घेतली जात नाही या मागे नेमकी काय कारणं असवीत या याचे उत्तर आजपर्यंत कोणाला मिळाले नाहीय.” असे परमसिंह म्हणाला. या मालिकेत नायक ‘रंगीला’ याची भूमिका रंगविणारा हा कलाकार म्हणाला, “महिलांनी आपल्यावर होणार्‍या या अन्याय-अत्याचाराबाबत मौन सोडलं पाहिजे आणि मोकळेपणाने याविषयी बोलले पाहिजे.सद्यस्थिती बघता अत्याचारांविरोधात आवाज उठविणार्‍या महिलांची संख्या वाढत आहे, इतर महिलांनीही न घाबरता आपल्यावर झालेल्या अत्याचारांविषयी आवाज उठवायला पाहिजे.परंतु यातील दु:खाची बाब ही आहे की बहुतांशी महिलांना समाज काय म्हणेल, याची किंवा आपल्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोण कसा असेल याचीच भीती वाटत असल्याने महिला या अत्याचारांविरोधात आवाज उठवताना जास्त प्रमाणात दिसत नाहीत. महिलांवरील अत्याचारांवर भाष्य करणारी आणि सामान्य जनतेला अशा अत्याचारांबाबत सजग करणारी गुलामसारखी मालिका मला साकारता आली, याचा मला आनंद वाटत असल्याचे परमसिंहने सांगितले.