अलीकडेच पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्तीने भाजपात प्रवेश केला होता, त्यापाठोपाठ आता १९९० च्या दशकातील प्रसिद्ध पौराणिक मालिका रामायण यामधील अभिनेता अरूण गोविल यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्री रामाची भूमिका अरूण गोविल यांनी साकारली होती.
अरूण गोविल यांनी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात काल पक्षाचं सदस्यत्व घेतलं. सध्याच्या काळात जे आमचं कर्तव्य आहे ते करायला हवं. मला राजकारण याआधी समजत नव्हते, परंतु नरेंद्र मोदी हे जेव्हापासून देश सांभाळत आहेत, तेव्हा देशाच्या राजकारणात बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. माझ्या मनात जे येतं ते करून मी मोकळा होतो असं त्यांनी सांगितले. तसेच आता मी देशासाठी योगदान देऊ इच्छितो, त्यासाठी मला एका व्यासपीठाची गरज होती आणि भाजपापेक्षा चांगलं व्यासपीठ मला मिळालं नाही, पहिल्यांदा मी ममता बॅनर्जी यांना जय श्री राम घोषणा देण्यापासून एलर्जी असल्याचं पाहिलं, जय श्री राम ही फक्त घोषणा नाही असा टोला अरूण गोविल यांनी ममता बॅनर्जींना लगावला होता.
अरुण गोविल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. पाहा त्यातील काही मजेदार मीम्स...