इंद्रनील सेनगुप्ताला तयार होण्यास महिला सहकलाकारांपेक्षा अधिक वेळ लागतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 13:33 IST
मुलींना तयार होण्यास अधिक वेळ लागतो, अशी आपली समजूत असते. पण आता ती गोष्ट इतिहासजमा झाली आहे. कारण ‘निम्की ...
इंद्रनील सेनगुप्ताला तयार होण्यास महिला सहकलाकारांपेक्षा अधिक वेळ लागतो!
मुलींना तयार होण्यास अधिक वेळ लागतो, अशी आपली समजूत असते. पण आता ती गोष्ट इतिहासजमा झाली आहे. कारण ‘निम्की मुखिया’ मालिकेत अभिमन्यू रायची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता याला चित्रीकरणासाठी तयार होण्यास त्याच्या महिला सहकलाकारांपेक्षा अधिक वेळ लागतो. मालिकेच्या निर्मितीशी जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “त्याच्यामुळे अनेकदा अन्य कलाकारांना वाट बघत बसावं लागतं. त्याच्यामुळे अनेकदा चित्रीकरणास उशीर होतो. बूट असो की केशभूषा, तो प्रत्येक बाबतीत तो खूप बारकाईने लक्ष घालतो. या गोष्टी जो पर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत तो पुढच्या कामाला लागत नाही. असून त्याला सर्व गोष्टी जागच्या जागी हव्या असतात.”पडद्यावर आपण सुंदर दिसावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. पण त्यासाठी इतरांचा खोळंबा करण्याची गरज नाही.त्याला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात त्यामुळे छोट्या पडद्यावरचा मि.परफेक्शनिस्ट म्हणून त्याला सेटवरही त्या मि.परफेक्शनिस्ट म्हणूनच ओळखले जाते.गेल्या काही दिवसांपासून इंद्रनीलचा एक पाय मुंबईत,तर दुसरा कोलकात्यात आहे,याला कारणही तसे खास आहे.सध्या तो एका बंगाली चित्रपटाचही शूटिंगमध्ये बिझी आहे.त्यामुळे सध्या तो मालिका आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींचे शूटिंग करत असल्यामुळे ‘निम्की मुखिया’च्या चित्रीकरणासाठी त्याला मुंबईत राहावे लागते आणि त्याच्या बंगाली चित्रपटांतील भूमिकांसाठी त्याला कोलकात्यात राहावे लागते.बंगाली चित्रपटांमुळे आपण आपल्या संस्कृतीशी जोडलेलो राहतो, असे त्याचे मत असून त्यामुळे त्याला बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यास खूप आवडते.हिंदी चित्रपटांमुळे तो व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि एक अभिनेता म्हणून लोकांच्या लक्षात राहतो.निम्की मुखिया या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला असून आपण या मालिकेद्वारे आमदाराची भूमिका करत असल्याची त्याची भावना आहे.यासंदर्भात इंद्रनीलने सांगितले,“मला माझं क्षितीज व्यापक करायचं असून प्रत्येक माध्यमात काम करायचं आहे. माझं तेच काम आहे. कोलकाता हे कामाचं ठिकाण आहे.मी तिथे येतो काम करतो आणि पुन्हा परत जातो.मी शक्य तितक्या भूमिका रंगवण्याचा प्रयत्न करतो असल्याचे तो सांगतो.