Join us

'मन उडू उडू झालं'मध्ये रंगणार इंद्रा आणि दिपूचा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 16:15 IST

Man Udu Udu Zala : 'मन उडू उडू झालं' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. इंद्रा आणि दिपूचा गोड शेवट शूट करुन मालिकेचाही गोड शेवट करत ही मालिका संपणार आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. इंद्रा आणि दिपूचा गोड शेवट शूट करुन मालिकेचाही गोड शेवट करत ही मालिका संपणार आहे. त्यामुळे सध्या मालिका मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्यामुळे लवकरच मालिकेत लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील BTS व्हिडीओ, पडद्यामागची धमाल, फोटो व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. मन उडू उडू झालं मालिकेचा एक तासाचा विशेष भाग येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

मन उडू उडू झालं या मालिकेत सध्या इंद्रा आणि दिपूच्या लग्नाची लगबग दिसतेय. या दोघांच्या लग्नाचा थाट प्रेक्षकांना येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल. या विशेष भागात इंद्राच्या हातावर दिपिका मॅडमच्या नावाची मेहंदी रंगणार असून याचीच एक झलक समोर आली आहे. 'दिपिका मॅडम', अशी मेहंदी इंद्राच्या हातावर रंगली असून लवकरच याचा भाग आपल्याला पहायला मिळणार आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मन उडू उडू झालं ही मालिका बंद होणार असून मालिकेत दिपूची भूमिका हृता दुर्गुळेनं तर इंद्राची भूमिका अजिंक्य राऊतने बजावली आहे. दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे.

सोशल मीडियावर सध्या या मालिकेविषयी चर्चा होताना दिसते आहे. या मालिकेने सुरू झाल्यापासून टीआरपीच्या स्पर्धेतही विविध मालिकांना मागे टाकले होते. आता मालिका संपणार म्हटल्यावर चाहतेही भावनिक झाले आहेत.

टॅग्स :झी मराठी