'बाहुबली' सिनेमाचा हा गायक गाजवणार इंडियन आयडल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 14:26 IST
येत्या 24 डिसेंबर पासून इंडियन आयडलची सुरूवात होणार आहे. पुन्हा एकदा अनु मलिक फरहा खान आणि सोनु निगम ही ...
'बाहुबली' सिनेमाचा हा गायक गाजवणार इंडियन आयडल?
येत्या 24 डिसेंबर पासून इंडियन आयडलची सुरूवात होणार आहे. पुन्हा एकदा अनु मलिक फरहा खान आणि सोनु निगम ही तिकडी या कार्यक्रमाला जज करणार आहेत. इंडियन आयडलच्या यंदाच्या पर्वासाठी 160 स्पर्धकांमधून 14 स्पर्धक निवडण्यात आले आहेत त्यात 'बाहुबली' या सिनेमाचा गायक एल.व्ही.रेवंथ(हैद्राबाद) स्पर्धक म्हणून सामील झाला आहे.ऑडिशन दरम्यान ''जनम जनम साथ चलना युँ ही'' हे गाणं गात रेवंथने जजेसच्या मनाचा ताबा तर मिळवला होताच मात्र फरहानने त्याच्याविषयी विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की टॉलिवूडमध्ये मी प्ले बॅक सिंगीग करतो. मी नुकत्याच एका सिनेमाचे टायटल ट्रॅक गायले आहे सांगताच फरहानने सिनेमाचे नाव विाचरले त्यावेळी 'बाहुबली' हे नाव घेताच जजेसही हैराण झाले.इतक्या मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमात काम करूनही आज रेवंथला इंडियन आयडलाचा मंच हा महत्त्वाचा वाटला. हे ऐकुनच जजेसही त्याच्या प्रेमात पडल्याचे पाहायाला मिळाले. नुकतेच मुंबईत इंडियन आयडलचे भव्य लॉन्चिंग करण्यात आले यावेळी 'बाहुबली'च्या या गायकाने त्याचा दमदार परफॉर्मन्स देत वाहवा मिळवली.इंडियन आयडल कार्यक्रमात मोठी स्वप्न घेवून स्पर्धक सहभागी होतात.बाहुबलीच्या गायकाने इतके मोठे यश मिळवूनही इंडियन आयडलच्या मंचावर स्पर्धक म्हणून गाणे गायची ईच्छा होती.टाॅलिवूडमध्ये रेवंथ आज एक यशस्वी गायक म्हणून ओळखला जातो.मात्र त्याला बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण करायचे आहे त्यासाठी त्याला उत्तम शिक्षण देणारा इंडियन आयडला हाच एक मंच असल्याचे म्हटले आहे. इंडियन आयडल या कार्यक्रमात जजेस माझे गायन कौशल्य पडताळणार आहेत.या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळणार असल्यामुळे मला एक गायक म्हणून नाही तर स्पर्धक म्हणून सहभागी व्हायला मिळाल्याचा आनंद वाटत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. बॉलिवूडमध्ये इतर गायकांप्रमाणे यश मिळवण्यासाठी सध्या खूप मेहनत करत असल्याचेही त्याने म्हटले आहे. इंडियन आयडलचे विजेतेपद पटकावण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.12 वर्षापूर्वी इंडियन आयडलची सुरूवात झाली होती.यांत मराठमोळ्या अभिजीत सांवतने पहिला इंडियन आयडल बनत अख्या महाराष्ट्राची मान उंचावली होती. या पहिल्या पर्वाने प्राजक्ता शुक्रे,राहुल वैद्य,अमित साना,अमित टंडन असे अनेक गायक दिले.आजही या गायकांची जादू कायम आहे. अंदाज,रियाज आणि आवाज अशाच प्रकारच्या हटके थीमला घेऊन टॅलेंटच्या शोधात पुन्हा एकदा इंडियन आयडल सज्ज झाले आहे.